होमपेज › Sangli › पलूस कॉलनीतील अपघातात बहेचा मोटारसायकलस्वार ठार

पलूस कॉलनीतील अपघातात बहेचा मोटारसायकलस्वार ठार

Published On: Jan 28 2018 1:33AM | Last Updated: Jan 27 2018 11:39PMकुंडल :  वार्ताहर
 कुंडल (ता. पलूस) येथील तासगाव - कराड रस्त्यावर  पलूस कॉलनी येथे अपघातात चंद्रहार उत्तमराव पाटील ( वय 43, रा. बहे, ता. वाळवा ) हे ठार झाले. याप्रकरणी अक्षय अशोक जगताप (रा. हवेली वडगाव,  ता. कराड) याच्या विरोधात  कुंडल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी :  चंद्रहार   पाटील  दुचाकी (एम. एच. 10 सी.बी. 7549) वरुन गुरुवारी रात्री निघाले होते.  पलूस कॉलनीजवळ  अक्षय  जगताप  दुचाकीवरून भरधाव वेगाने   समोरुन आले.  चंद्रहार पाटील  आणि त्यांच्या गाडीची  जोरदार धडक झाली. पाटील यांच्या डोक्याला गंभीर मार लागला तसेच अक्षय जगतापही जखमी झाले.  

कुंडल पोलिस व स्थानिक नागरिकांनी जखमींना तत्काळ  सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल केले.  परंतु डोक्याला गंभीर इजा  झाल्याने  पाटील यांचे वाटेतच निधन झाले.हवालदार संभाजी महाडिक तपास करीत आहेत.