Mon, Sep 24, 2018 16:57



होमपेज › Sangli › दारूसाठी पोटच्या मुलानेच केला आईचा निर्घृण खून

दारूसाठी पोटच्या मुलानेच केला आईचा निर्घृण खून

Published On: Mar 05 2018 1:44AM | Last Updated: Mar 05 2018 12:02AM



आटपाडी : प्रतिनिधी

आटपाडी तालुक्यातील पांढरेवाडी-काळीखडी येथे मुलाने दारूच्या नशेत वृद्ध मातेचा डोक्यात कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. कमल चंदर वाघमारे (वय 70) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा वसंत चंदर वाघमारे (40) याला पोलिसांनी अटक केली आहे. 

वसंत वाघमारे आणि त्याचे कुटुंबीय आटपाडी तालुक्यात झाडे घेऊन त्याचा कोळसा तयार करण्याचे काम करतात. वसंतला दारूचे व्यसन होते. दारू सोडण्याच्या कारणावरून त्याचे वृद्ध आईशी सतत भांडण व्हायचे. रविवारी सकाळी वसंतचे आईशी पुन्हा जोरदार भांडण झाले. यावेळी वसंत दारू प्यायलेला होता. वादावादी झाल्याने संतापलेल्या वसंत याने घरातील कोयता घेऊन आईच्या डोक्यात वार केले. डोक्यात वर्मी घाव लागल्याने कमल वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला. काळीखडी परिसर निर्जन असल्याने सायंकाळपर्यंत खुनाची घटना कोणालाही समजली नव्हती. सायंकाळी परिसरातील काहीजणांना कमल वाघमारे यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मुकादम राजेंद्र चव्हाण यांनी फिर्याद दिली. खुनाची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलगा वसंत यानेच खून केल्याचे समजताच पोलिसांनी त्याला अटक केली. तपास सहायक पोलिस निरीक्षक सुधाकर देढे करीत आहेत.