Wed, Aug 21, 2019 02:27होमपेज › Sangli › ट्रॅव्हल्समधून तीन लाख लंपास केल्याचा कांगावा

ट्रॅव्हल्समधून तीन लाख लंपास केल्याचा कांगावा

Published On: Mar 18 2018 1:06AM | Last Updated: Mar 18 2018 12:12AMनागज : वार्ताहर

एका प्रवाशाने तीन लाख बावीस हजार रुपयांची बॅग लंपास केली असल्याचा आरोप करीत चालकाला ट्रॅव्हल्स बस पोलिस ठाण्यात नेण्यास भाग पाडले. दरम्यान, बसमधील प्रवाशांनाही दिवसभर पोलिस ठाण्यात ताटकळत बसावे लागले. सायंकाळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. पैशाची बॅग चोरीला गेल्याचा केवळ कांगावाच केला असल्याची चर्चा सुरू होती.

नागपूरहून कोल्हापूरला निघालेली  ट्रॅव्हल्स बस ( एम.एच.40 ए.टी.561) शनिवारी सकाळी नागज फाट्याजवळ आली. यवतमाळहून कोल्हापूरला निघालेल्या बसमधील एका प्रवाशाने तीन लाख रुपये असलेली बॅग लंपास केली असल्याचा आरोप करीत ट्रॅव्हल्स बस पोलिस ठाण्यात नेण्यास चालकाला सांगितले. दरम्यान, त्या प्रवाशाने चक्‍क चालकावरच चोरीचा आळ घेतला होता. चालकाने सर्व प्रवाशांसहित बस कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात नेली.दरम्यान 

दिवसभर पोलिसांनी चौकशी केली.बसमध्ये सी.सी.टी.व्ही.कॅमेरे होते. मात्र त्या फुटेजमध्ये काही आढळले नाही.पोलिसांनी त्या प्रवाशाला  फिर्याद देण्यास सांगितले.पण त्यांनी फिर्याद दाखल करण्यास नकार दिला.त्यांची पैशाची बॅग घरीच राहिली असल्याचे पत्नीने फोनवरून सांगितले असल्याची चर्चा पोलिस ठाण्यात सुरू होती.

Tags : money, bag, stolen, Accusation, Travels, Bus, Police, Station,