Tue, Apr 23, 2019 19:33होमपेज › Sangli › सांगली : मुहम्मद पैगंबर जयंती निमित्त शहरात मिरवणूक

सांगली : मुहम्मद पैगंबर जयंती निमित्त शहरात मिरवणूक

Published On: Dec 02 2017 3:04PM | Last Updated: Dec 02 2017 3:18PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

इस्लाम धर्माचे संस्थापक मुहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त शहरात आज मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत लहान मुला-मुलींसह विविध जाती-धर्मातील लोकही सहभागी झाले होते. सकाळी नऊच्या सुमारास सुरू झालेली ही मिरवणूक बारापर्यंत सुरू होती.

सकाळी नऊच्या सुमारास बदाम चौकातून ही मिरवणूक सुरू झाली. तेथून राममंदीर- सिटी पोष्ट- राजवाडा- पटेल चौक- झाशी चौक- हरभट रस्ता- महापालिका- बसस्थानक- फौजदार गल्ली- हिंदू मुस्लीम चौक या मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत लहान मुले-मुली मोठ्या संख्येंने सहभागी झाले होते. मदिनाची प्रतीकृतीही मिरवणुकीत होती. अग्रभागी घोडे होते. हिंदू मित्र मंडळ, एकता रिक्षा मंडळ, दलीत संघटना, शीख समाजातील पदाधिकारी असे विविध जाती-धर्मातील लोक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. माजी मंत्री पतंगराव कदम यांनीही काही काळ मिरवणुकीत सहभाग घेतला. त्या शिवाय नूर जमादार, आसीफ बावा, उमर गवंडी, इकबाल जमादार, शहानवाज फकीर, युसूफ मेस्त्री, जावेद पठाण, साहील खाटीक आदी या मिरवणुकीत सहभागे झाले होते. दुपारी बाराच्या दरम्यान बदाम चौकात मिरवणुकीची सांगता झाली. सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरिक्षक रवींद्र शेळके यांनी या मिरवणुकीचे पोलिस स्टेशनजवळ स्वागत केले.