Mon, Aug 19, 2019 04:56होमपेज › Sangli › मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे षडयंत्र : राज ठाकरे

मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे षडयंत्र : राज ठाकरे

Published On: Jan 14 2018 2:36PM | Last Updated: Jan 14 2018 2:36PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी 

मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे षडयंत्र सुरू आहे. त्यामुळे मुंबईत मराठी टक्का वाढला पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत  केले. राज ठाकरे आज सांगली शहराच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित बैठकीत ते बोलत होते. 

मुंबईत मराठी माणूस टिकावा यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी संस्था, शैक्षणिक व अन्य व्यापारी संकुलांचा लवकरच मेळावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संस्थांनी मुंबईत आपल्या संस्थांकडून जाळे विणावे. या नवीन संस्थांच्या पाठीशी मनसे ठामपणे उभी आहे. या संस्थांनी मराठी माणसांना नोकऱ्या द्याव्यात, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

वाचा: लवकरच बॅकलॉग भरून काढणार: राज ठाकरे