Wed, Mar 27, 2019 02:09होमपेज › Sangli › सांगली महापालिकेच्या दारातच मनसेचा ‘बाजार’ (video) 

सांगली महापालिकेच्या दारातच मनसेचा ‘बाजार’ (video) 

Published On: Feb 21 2018 4:06PM | Last Updated: Feb 21 2018 4:10PMसांगली : पुढारी ऑनलाईन 

शहरात भाजी विकण्यासाठी हक्काची जागा नसल्याने आज मनसे तर्फे महापालिकेच्या दारातच भाजी बाजार भरवण्यात आला. मनसेच्या या अनोख्या आंदोलनाने भाजी विक्रेत्यांनी त्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष्य वेधले. 

अनेक वर्षांपासून भाजी मंडई बांधावी अशी मागणी वारंवार केली जात आहे. मात्र, याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष  केले आहे.  यामुळे  आक्रमक पावित्रा घेत माजी आमदार नितीन शिंदे आणि स्वाती शिंदे यांनी शहरातील भाजीविक्रेत्यांना एकत्र करून महापालिकेच्या दारातच बाजार भरवला. या लक्षवेधी आंदोलनामुळे महापालिका प्रशासनाची तारांबळ उडाली. मनसेच्या आजच्या आंदोलनामुळे महापालिकेला प्रवेशद्वार बंद करावे लागले.