Sun, Sep 23, 2018 16:26होमपेज › Sangli › सांगली : माजी महापौरांसह भाजपाच्या  चार उमेदवारांचे अर्ज वैध

सांगली : माजी महापौरांसह भाजपाच्या  चार उमेदवारांचे अर्ज वैध

Published On: Jul 13 2018 6:56PM | Last Updated: Jul 13 2018 6:56PMमिरज : प्रतिनिधी

भाजपचे प्रभाग क्र. 20 मधील  उमेदवार माजी महापौर विवेक कांबळे यांच्यासह भाजपाच्या 4 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. अर्ज वैध ठरविण्यात आलेल्यां मध्ये गणेश माळी,  जयश्री कुरणे, संगीता खोत या उमेदवारांचा समावेश आहे. अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी संजय पाटील यांनी दिली.

चुरशिने लढत

एकमेकां विरुध्द घेण्यात आलेल्या हरकती फेटाळण्यात आलेल्याने मिरजेतील प्रभाग क्र. 7 आणि 20 मधील निवडणुक भाजप विरुध्द कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी अशी अटीतटीची होणार आहे.

उच्च न्यायालायात धाव

माजी महापौर विवेक कांबळे यांच्या विरुध्द घेण्यात आलेली हरकत निवडणुक निर्णय अधिकारी यांनी  फेटाळल्याने कांबळे यांच्या विरुध्द उच्च न्यायालायात धाव घेणार असल्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार योगेंद्र थोरात यांनी सांगितले.