Tue, Mar 19, 2019 05:09होमपेज › Sangli › अवैध गौण खनिज उत्खनन; तीन कोटींचा मुद्देमाल जप्‍त

अवैध गौण खनिज उत्खनन; तीन कोटींचा मुद्देमाल जप्‍त

Published On: Mar 20 2018 1:50AM | Last Updated: Mar 20 2018 1:50AMकडेगाव : शहर प्रतिनिधी 

तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी कडेगाव-पलूस प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख व तहसीलदार अर्चना शेटे यांनी सोमवारी कारवाई केली. त्यावेळी वीस वाहनांसह तब्बल तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तालुक्यात अवैधरीत्या दगड, माती, मुरुमाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. देशमुख यांना मिळाली.

त्यांनी कडेगावच्या तहसीलदार अर्चना शेटे व तलाठी यांच्या पथकाला बरोबर घेऊन बोंबाळेवाडी, रायगाव, विहापूर या ठिकाणी छापा टाकून अवैधरीत्या दगड, माती आणि मुरुमाची वाहतूक करणारे 18 ट्रक व दोन ट्रॅक्टर पकडले. सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. यातील काही वाहने पळवून नेली होती; परंतु महसूल अधिकार्‍यांनी त्यांचा पाठलाग करून  पकडली.

पकडलेले डंपर, त्यांचे मालक आणि क्रमांक असे -  संजय राठोड यांचा (एम.एच. 43, 5410), (एम. एच 11, एम 4875 ), रवी कराळे (एम. एच 50, 2592), (एम.एच. 09 7321), एस.पी. सप्लायर्स (एम. एच. 50 9006), भोगे सरकार (एम. एच. 25 4043), संभाजी मोहिते, भीमाशंकर घोडके (एम.एच.32, 7020), (एम.एच.11 एम 4861), (एम.एच. 11 एल.0187), (एम.एच 11 एल. 8400), (एम. एच.11 एम.4806), एम. एच. 11, एल.0867 ), (एम.एच 11 4079), (एम.एच.10 झेड 3544 ), (एम. एच. 10, 1779), (एम. एच.11, 5448), (एम.एच.11 5849), (एम. एच. 12, 4032).  याशिवाय ट्रॅक्टर (एम. एच.11, 7711), (एम. एच.09 8558 जप्त केले आहेत. या सर्व वाहनांची अंदाजे किंमत तीन कोटी रुपये आहे.  

 प्रांताधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, तालुक्यात अवैधरित्या असलेल्या वाळू, दगड, माती आणि मुरुमाच्या साठ्याचे पंचनामे करून मंडळ अधिकारी व तलाठ्यांना तातडीने अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. तहसीलदार शेटे म्हणाल्या, तालुक्यात अवैधरित्या गौण खनिज साठ्याचे पंचनामे सुरू आहेत. यासाठी चार भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. दोषींवर कडक दंडात्मक आणि फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

tags ; Kadegaon,news, minerals,illegal, mining,transportation, Action,Kadegaon,