Sun, Jul 21, 2019 02:01होमपेज › Sangli › दूध दर आंदोलनाची सांगलीत ठिणगी; टँकर फोडला

दूध दर आंदोलनाची सांगलीत ठिणगी; टँकर फोडला

Published On: Jul 15 2018 7:52PM | Last Updated: Jul 15 2018 7:52PMइस्‍लामपूर : पुढारी ऑनलाईन

स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून (१६ जुलै) दूध दर आंदोलनाची हाक दिली आहे. परंतु, त्यापूर्वीच आज, रविवारी सायंकाळी आंदोलनाची ठिणगी सांगली जिल्‍ह्यातील वाळवा तालुक्यात पडली. पुणे बेंगळुरु महामार्गावरील नेर्लेजवळ आंदोलकांनी मुंबईकडे चाललेला दुधाचा टँकर फोडला. त्यामुळे आंदोलन चांगलेच पेटण्याची चिन्‍हे आहेत. 

आंदोलकांनी फोडलेला दुधाचा टँकर हा वारणा दूध संघाचा आहे. त्यानंतर टँकरमधील दुधाचा रस्‍त्यावर पूर आल्याचे चित्र होते. या घटनेनंतर महामार्गावर पोलिस बंदोबस्‍त तैनात करण्यात आला असून राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्यांनाही पाचारण करण्यात आले आहे.