Wed, Feb 20, 2019 17:10होमपेज › Sangli › म्हैसाळचे पाणी सलगरेतील पाचव्या टप्प्याकडे 

म्हैसाळचे पाणी सलगरेतील पाचव्या टप्प्याकडे 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

लिंगनूर : वार्ताहर

म्हैसाळ योजनेच्या बेडग येथील तिसर्‍या टप्प्यातून  सोमवारी सायंकाळी 4 वाजता उपसा सुरू झाला. मंगळवारी दुपारी दीड वाजेपर्यंत पाणी लांडगेवाडी (आरग) येथील चौथ्या टप्प्यात पोहोचले. तेथून सलगरे येथील पाचव्या टप्प्याकडे मार्गस्थ झाले आहे. चारही टप्पे सोमवार सायंकाळ पासून सुस्थितीत सुरू आहेत. शिवाय चालू विद्युत मोटारींची संख्याही आता चार टप्प्यात मिळून एकूण 9 वरून 21 वर पोहोचली आहे. 

मंगळवारी रात्री सलगरेत पाणी पोहोचणार : 

सध्याची चालू पंपाची संख्या आणि पाण्याची गती पाहता दुपारी दीड वाजता लांडगेवाडी येथील चौथा टप्पा सुरू झाल्यानंतर अंतर जास्त असल्याने बेळंकी मार्गे हे पाणी सलगरे येथे असणार्‍या पाचव्या टप्प्यात रात्रीपर्यंत जलाशयात पोहोचेल, असा अंदाज आहे. बुधवारपासून दुपारी कवठेमहांकाळ तालुक्यात पाणी प्रवेश करणार आहे.


  •