Tue, Apr 23, 2019 20:22होमपेज › Sangli › म्हैसाळचे पाणी बेडगपर्यंत पोहोचले

म्हैसाळचे पाणी बेडगपर्यंत पोहोचले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

लिंगनूर : वार्ताहर

म्हैसाळ योजनेचे उन्हाळी आवर्तन  शनिवार खासदार संजय पाटील यांच्याहस्ते सुरू करण्यात आले. त्यानंतर एका दिवसात  म्हैसाळ येथील पहिल्या टप्प्यातून नरवाड येथील दुसर्‍या टप्प्यात आणि रविवारी सकाळी नऊ वाजता बेडग येथील तिसर्‍या टप्प्याच्या जलाशयात पोहोचले, अशी माहिती पाटबंधारे खात्याच्या अधिकार्‍यांनी दिली. 

म्हैसाळ योजनेचे यंदाचे आवर्तन बहुचर्चित, आंदोलने, राजीनामास्त्र आणि श्रेयवाद अशा मुद्दावर सुरू होण्यापूर्वीच गाजले. अखेर आवर्तनासाठी जिल्ह्याच्या खासदारांनी सरकारला 15 कोटी रुपये देण्यास भाग पाडून आवर्तन सुरू केले. 

उद्घाटन झाल्यानंतर म्हैसाळ येथील टप्पा क्रमांक एकमधील दोन मोटारी आणि नरवाड येथील टप्पा क्रमांक तीनमध्येही दोन मोटारी सुरू केल्या आहेत. 
त्यामुळे आज पाणी बेडग येथील हुल्लेगिरी फाटीनजीक असणार्‍या तिसर्‍या टप्प्याच्या जलाशयात पोहोचले आहे. ते रविवारी मध्यरात्री किंवा सोमवार सायंकाळपर्यंत लांडगेवाडी आरग येथील चौथ्या टप्प्याकडे  पाणी रवाना होण्याची शक्यता आहे. 


  •