Tue, Jul 23, 2019 19:10होमपेज › Sangli › पारा घसरला : धुके, थंडीत वाढ

पारा घसरला : धुके, थंडीत वाढ

Published On: Dec 17 2017 2:13AM | Last Updated: Dec 16 2017 10:28PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

शहरासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पारा घसरल्यामुळे तापमानात पुन्हा घट झाली आहे. त्यामुळे थंडीत वाढ झाली असून पहाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणात धुके पडत आहे. याचा भाजीपाला आणि बागायती पिकांना फटका बसण्याचा धोका आहे. 

अरबी समुद्रात वादळ आल्याने गेल्या दहा दिवसात तापमानात वाढ झाली होती. बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी तुरळक पाऊसही झाला. वादळ गेल्यानंतर आता तापमानात पुन्हा एकदा घट होत आहे. पहाटेचे किमान तापमान 18 अंशापर्यंत खाली येत आहे. तर दिवसाचे कमाल तापमान 32 डिग्री अंशापर्यंत वाढत आहे. तापमानात घट झाल्याने थंडीत वाढ झाली आहे. त्याशिवाय पहाटेच्यावेळी धुके पडत आहे. 

सकाळी सहाच्या सुमारास धुक्याची चादर पसरल्यासारखे चित्र दिसून येते. थंडी वाढल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटत आहेत. धुक्यामुळे पिकांवर दहिवर पडत आहे. याचा हरभर्‍यासारख्या काही पिकांना उपयोग होत असला तरी भाजीपाला आणि बागायती पिकांवर रोगांचा प्रार्दुभाव वाढत आहे. शेतकर्‍यांनी औषध फवारणीही सुरू केली आहे.