नदाफ टोळीला ‘मोका’

Last Updated: Oct 11 2019 1:16AM
Responsive image

Responsive image

सांगली : प्रतिनिधी
खुनाचा प्रयत्न, दरोड्यासह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सांगलीतील गुंड शाहरूख नदाफ टोळीला गुरुवारी ‘मोका’ लावण्यात आला. टोळीत सहा जणांचा समावेश आहे. पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांनी मोक्‍का कारवाईला मंजुरी दिली. 

शाहरूख रुस्तम नदाफ (वय 19, रा. त्रिमूर्ती कॉलनी, पोळ मळा), सोहेल ऊर्फ टोल्या गफूर तांबोळी (20, सोलापूर, सध्या, हनुमाननगर गल्ली क्रमांक 1), संतोष ऊर्फ ऋतिक शंकर चक्रनारायण (19, अक्‍कलकोट, जि. सोलापूर, सध्या हनुमाननगर, सांगली), अजय ऊर्फ वासुदेव भूपाल सोनवले (20, विठ्ठलनगर, शंभरफुटी) व दोन अल्पवयीन गुन्हेगारांचा समावेश आहे.

टोळीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी, चोरी, बेकायदा हत्यार बाळगणे, घरात घुसून मारहाण करणे, बंदी आदेशाचा भंग, अपहरण, विनयभंग, खुनी हल्ला करून लूट व दुचाकीची चोरी इत्यादी गुन्ह्यांची नोंद सांगली शहर, ग्रामीण संजयनगर, विश्रामबाग, मिरज शहर व गांधी चौक पोलिस ठाण्यात आहे.गेल्या दोन वर्षांपासून ही टोळी गुन्हेगारीत सक्रिय आहे. टोळीविरुद्ध अनेकदा कारवाई केली. मात्र, तरीही त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच राहिल्या. त्यामुळे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी टोळीविरुद्ध ‘मोकां’तर्गत प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिला होता. सांगली ग्रामीण पोलिसांनी हा प्रस्ताव तयार केला. शर्मा यांनी या प्रस्तावाचे अवलोकन करून तो अंतिम मंजुरीसाठी कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांना सादर केला होता.वारके यांनी गुरुवारी नदाफ टोळीला ‘मोका’ लावण्यास मंजुरी दिली. 

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, ग्रामीणचे चंद्रकांत बेंदरे, हवालदार संतोष माने, सचिन मोरे, सिद्धाप्पा रूपनगर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.स्‍ट्राँगरूम आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवा : धनंजय मुंडेंची मागणी


अमेरिकेमध्ये जाण्याचा ३२५ भारतीयांचा प्रयत्न फसला; मेक्सिकोतून पाठवले परत 


कोल्हापूर : ऋतुराज पाटलांच्या प्रचारासाठी ज्योतिरादित्य शिंदेंचा मराठीतून संवाद  


रंजन गोगोई यांच्‍या निवृत्तीनंतर मराठी माणूस होणार सरन्यायाधीश?


पीएमसी बँक खातेदारांना सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा नाही


KBC 11: ' १५ वर्षांची होते, तेव्हा ८ लोकांनी केला बलात्‍कार' ​​​​​​​


स्पृहाच्या या लुकमधील 'विक्की वेलिंगकर'चे नवे पोस्टर 


'या' हॉलिवूड अभिनेत्रीने ऋतिकचा उचलला नाही फोन 


कोल्‍हापूर : बनावट नोटांची छपाई; तिघांना अटक 


प्रफुल्ल पटेल चौकशीसाठी ईडीसमोर हजर