Tue, Jul 16, 2019 02:09होमपेज › Sangli › तासगावात मंडल अधिकार्‍यांना मारहाण

तासगावात मंडल अधिकार्‍यांना मारहाण

Published On: Apr 27 2018 1:08AM | Last Updated: Apr 27 2018 12:29AMतासगाव : शहर प्रतिनिधी

येथील मंडल अधिकारी उत्तम देवाप्पा कांबळे यांनी गुरुवारी पहाटे वाळू उपसा करणारी पीकअप गाडी पकडली. ते ती तहसील कार्यालयाकडे घेऊन जात होते. त्यावेळी  त्यांना  अडवून शिवीगाळ करीत मारहाण करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी तासगाव पोलिसांत रोहित ऊर्फ छोट्या तानाजी नलवडे, अमोल कांबळे व अन्य एक अनोळखी (सर्व रा. वरचे गल्‍ली, तासगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत तासगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी : गुरुवारी पहाटे खाडेवाडी येथे मंडल अधिकारी कांबळे हे गस्त घालत होते. त्यावेळी रोहित हा पीकअप गाडी (एमएच 10 बीआर 4984) मधून चोरून वाळू उपसा करत होता.

मंडल अधिकार्‍यांनी ही गाडी अडवून ताब्यात घेतली. यामध्ये अर्धा ब्रास वाळू होती. कांबळे ही पीकअप तहसील कार्यालयाकडे नेत होते. त्यावेळी अन्य दोघे आले. त्यांनी पीकअपच्या आडवी दुचाकी लावून गाडी अडवली.

मंडल अधिकारी कांबळे यांना पीकअपमधून बाहेर ओढून शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पीकअप घेऊन त्यांनी पलायन केले. तपास हवालदार कुंभार करीत आहेत.