Wed, Nov 21, 2018 07:15होमपेज › Sangli › मराठा आंदोलनात पेड लोक शिरले : चंद्रकांत पाटील 

मराठा आंदोलनात पेड लोक शिरले : चंद्रकांत पाटील 

Published On: Jul 24 2018 1:19PM | Last Updated: Jul 24 2018 5:50PMसांगली : पुढारी ऑनलाईन

राज्यातील काही भागात सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही पेड लोक मराठा आंदोलनात घुसले असल्याचा आरोप केला आहे.

आंदोलकांनी पेड लोकांना बाजूला करायला हवे, असेही त्यांनी नमूद केले आहे. मंत्र्यांच्या गाडी फोडून मराठा आरक्षण मिळणार का? अशा हिंसक आंदोलनाने काय साध्य होणार? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. ते सांगली येथे बोलत होते.

मराठा आरक्षण न्यायालयाच्या हातात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.