Tue, Sep 25, 2018 16:27होमपेज › Sangli › महामस्तकाभिषेक सोहळ्यात आरोग्याबाबत दक्षता

महामस्तकाभिषेक सोहळ्यात आरोग्याबाबत दक्षता

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 15 2018 8:53PMश्रवणबेळगोळ : प्रतिनिधी

श्रवणबेळगोळ येथे 12 वर्षांनी होत असलेल्या 88 व्या ऐतिहासिक महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी, विविध समित्यांसाठी अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. या सोहळ्यासाठी कर्नाटक शासन आणि महोत्सव समितीतर्फे आरोग्याबाबत दक्षता घेतली जात आहे. यासाठी तब्बल 32 वरिष्ठ अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. भोजन, निवास, पाणी, वीज, वाहतूक अशा विविध बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज आढावा बैठकीतून दक्षता घेण्याचे काम सुरू आहे.

शकलेशपुराचे उपजिल्हाधिकारी वरद रेेड्डी तर महामहोत्सव समितीचे सुरेश पाटील (सांगली) यांच्याकडे सर्व अधिकार दिले आहेत. जेवण, पाणी यांच्या दर्जापासून स्वच्छतेसाठी विशेष नियोजन केले आहे. प्रत्येक अन्नाचे परीक्षण करून वाढले जाते. तासाला पिण्याच्या पाण्याची चाचणी घेतली जाते. स्वयंपाक करणारे व वाटप करणार्‍यांसाठीही विशेष सुविधा दिल्या आहेत. 15 अग्निशामक दलाच्या गाड्या तैनात आहेत.