Tue, Jul 16, 2019 09:37होमपेज › Sangli › सुसलाद येथे हातभट्टी दारू जप्त

सुसलाद येथे हातभट्टी दारू जप्त

Published On: Mar 05 2018 1:44AM | Last Updated: Mar 04 2018 11:50PMउटगी  ः वार्ताहर

सुसलाद (ता. जत) जवळील  राजोबावाडी येथे हातभट्टीवर  पोलिसांनी छापा टाकला. भारत चव्हाण (वय 39) याच्याकडून 2 लिटर गावठी हातभट्टी दारू ताब्यात घेतली. तसेच  40 लिटर कच्च्या रसायनाचे कॅन फोडून नष्ट करण्यात आले. एकूण 1300 रुपयांचा मुद्देमाल मिळाला आहे.

ही कारवाई पोलिस निरीक्षक भगवान शिंदे, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण संपांगे, बापू शेंडे, पोलिस नाईक सचिन आटपाडकर, श्रीशैल वळसंग, अर्जुन सगर, महिला पोलिस सावंत, पोलिस नाईक संजय पवार सहभागी झाले होते.