Tue, Nov 13, 2018 06:05होमपेज › Sangli › सांगलीत हातभट्टीची दारू जप्त

सांगलीत हातभट्टीची दारू जप्त

Published On: Jan 03 2018 1:17AM | Last Updated: Jan 02 2018 11:31PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

शहरातील विश्रामबाग येथील स्फूर्ती चौकात जीपमधून बेकायदा नेण्यात येणारी तीनशे लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. यावेळी दारूसह, जीप असा 2 लाख 15 हजार 282 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या विशेष पथकाने रात्री ही कारवाई केली. हातभट्टी चालक, जीपचालकाला अटक केली. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

हातभट्टीचालक तानाजी नारायण मंडले (वय 35, रा. दानोळी), जीपचालक झाकीर खुदबुद्दीन शिकलगार (वय 45, रा. दानोळी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दानोळी (ता. शिरोळ) येथून एका जीपमधून (एमएच 09 एस 5861) हातभट्टी दारूची तस्करी होत असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री पथकाने विश्रामबाग परिसरात सापळा लावला होता. स्फूर्ती चौकात एक जीप पथकाने अडविली. जीपची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये सुमारे पाचशे लिटर हातभट्टीची दारू असल्याचे लक्षात आले. याबाबत चालकाकडे चौकशी केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. 
पोलिसांनी दारूसह जीप ताब्यात घेतली असून विश्रामबाग पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.