Sun, May 26, 2019 01:14होमपेज › Sangli › लिंगायत धर्ममान्यतेसाठी दोन्ही राज्याची ताकद लावू

लिंगायत धर्ममान्यतेसाठी दोन्ही राज्याची ताकद लावू

Published On: Dec 08 2017 1:42AM | Last Updated: Dec 07 2017 11:42PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

लिंगायत धर्माला मान्यता आणि  अल्पसंंख्याक दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांची ताकद लावू. मिशन फत्ते होईपर्यंत हा लढा अखंड सुरू ठेवू, अशी माहिती कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री एम. बी. पाटील यांनी दिली. यासाठी पक्षीय जोडे बाहेर ठेवून मी आघाडीवर राही, असे ते म्हणाले.

रविवारी (10 डिसेंबर) विजापूर येथे होणार्‍या लिंगायत महामोर्चाच्या पूर्व तयारीसाठी जतमध्ये शिवानुभव मंटप सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बसवकल्याणचे महास्वामी बसवप्रभू, मुरलीशंकर स्वामीजी, महामोर्चा समन्वय समितीचे  प्रदीप वाले, प्रा. विश्‍वनाथ मिरजकर, संजीव पट्टणशेट्टी आदि प्रमुख उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आदी राज्यांमध्ये लिंगायत धर्म मान्यतेसाठी जोरदार आंदोलन सुरू  आहे. हा एल्गार अखंडित ठेवून दिल्लीपर्यंत आवाज पोहोचवू. महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांकडून त्यासाठी ठराव करून प्रस्ताव पाठविण्यासाठी ताकद पणाला लावू. यावेळी सर्व मान्यवरांनी विजापूर मेळाव्यासाठी ताकद लावण्याचा निर्धार व्यक्‍त केला. सांगली जिल्ह्यातून हजार वाहने जाणार असल्याचे वाले यांनी सांगितले.

बसवराज पाटील, सौ. मीनाक्षी आक्की, डॉ. रविंद्र आरळी, बसवराज बिराजदार, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती रामगोंडा संती, विक्रम सावंत, सुरेश शिंदे, मन्सूर खतीब, धानाप्पा पट्टणशेट्टी, तुकाराम माळी, रमेश पाटील, आर. के. पाटील, सुभाष सायगावे, तुकाराम माळी, महादेव तेली आदी उपस्थित होते.