Mon, Jun 17, 2019 04:11होमपेज › Sangli › सांगली : आरवडेत वीज कोसळून नारळाचे झाड जळून खाक(video)

सांगली : आरवडेत वीज कोसळून नारळाचे झाड जळून खाक (video)

Published On: Jun 03 2018 8:31PM | Last Updated: Jun 03 2018 8:30PMतासगाव : प्रतिनिधी

आरवडे (ता. तासगाव) येथे वीज पडून नारळाचे झाड जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आरवडे परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. यावेळी आरवडे ते लोढे तलाव या रोडवरील अशोक वाघ यांच्या घरासमोरील नारळाच्या झाडावर वीज कोसळली. यामुळे झाडाला आग लागली. यामध्ये संपूर्ण झाड जळून खाक झाले आहे. आसपासच्या नागरिकांनी पाणी मारून आग विझवण्यात आली.

या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.