Tue, Apr 23, 2019 21:37होमपेज › Sangli › डॉ. कदम यांनी विकासात राजकारण आणले नाही 

डॉ. कदम यांनी विकासात राजकारण आणले नाही 

Published On: Mar 13 2018 11:04PM | Last Updated: Mar 13 2018 11:04PMकडेगाव : शहर प्रतिनिधी 
माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी विकासकामात कोणतेही राजकारण आणले नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले.

येथील पंचायत समितीच्यावतीने डॉ. कदम यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यावेळी देशमुख बोलत होते. सभापती मंदाताई करांडे, उपसभापती रविंद्र कांबळे उपस्थित होते.देशमुख म्हणाले, डॉ. कदम हे दिलदार मनाचे  नेते होते. त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले नाही, याची खंत वाटते. तालुक्याच्या विकासकामात त्यांचे मोठे योगदान आहे. सभापती करांडे म्हणाल्या, डॉ. कदम  अजातशत्रू व्यक्‍तिमत्व होते. त्यांच्याकडे  कोणतेही काम घेऊन गेल्यास त्यांनी कधीही कोणालाही रिकाम्या हातो पाठवले नाही. विकास कामात त्यांनी कधी पक्ष पाहिला नाही. मी विरोधी गटातील असूनही त्यांनी माझे प्रत्येक काम तातडीने केले.  जिल्हापरिषदेच्या सदस्य रेश्मा साळुंखे म्हणाल्या, कडेगाव तालुक्यात महिलांच्या शिक्षणाची टक्केवारी जादा आहे, ती डॉ.कदम यांनी उभ्या केलेल्या संस्थांमुळेच. विरोधी पक्ष नेते उदयकुमार देशमुख म्हणाले, डॉ. कदम यांच्या जाण्याने तालुक्याचे आणि जिल्ह्याचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. वनाधिकारी नितीन काळे म्हणाले, वन मंत्री म्हणून  त्यांची कामगिरी फार महत्त्वाची आहे.  पोलिस निरीक्षक के. एस. पुजारी, पं. स. सदस्या स्मिता महिंद, विकास पवार, मंगल क्षीरसागर, रवींद्र ठोंबरे, आबासाहेब साळुंखे, आबासाहेब करांडे   यांच्यासह तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयातील पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.