Tue, Jul 16, 2019 13:35होमपेज › Sangli › कुरळपमध्ये सावकाराच्या तगाद्याने त्याने घरच काढले विकायला

कुरळपमध्ये सावकाराच्या तगाद्याने त्याने घरच काढले विकायला

Published On: Feb 07 2018 1:36AM | Last Updated: Feb 06 2018 10:32PMकुरळप : वार्ताहर

कुरळप (ता. वाळवा) येथील एका कामगाराने सावकाराला 60 हजार रकमेचे व्याज 2 लाख 40 हजारांहून अधिक देऊनही कर्ज फिटलेले नाही. या सावकारांच्या तगाद्याने आता त्या पिडीत व्यक्तीने आपले  घरच विकायला काढले आहे. या  घटनेने परिसरात  सावकारांची दहशत चव्हाट्यावर आली आहे. येथील एका कामगाराने घरगुती अडचणीसाठी गावातील  सावकारांकडून 60 हजार रुपये घेतले होते. त्या रकमेचे दरमहा  6 हजार व्याज    नियमितपणे  गेली   45 महिने  तो भरत होता.  दरम्यानच्या काळात पत्नीच्या आजारपणात त्याचे 50 ते 60 हजार रुपये खर्च झाले. ते पैसे असेच हातउसने घेतले होते. त्यामुळे तो  सावकाराचे व्याज गेले चार महिने  देऊ शकला नाही. 

 सावकाराने त्याच्याकडे  व्याज व मुदलासाठी तगादा लावला. गेले चार महिने पत्नीचे आजारपण, सावकारांचा तगादा  यामुळे तो कामगार पूर्णपणे खचला आहे. सर्वच   वाटा  बंद   झाल्याने व सावकाराच्या तगाद्यापासून सुटका मिळविण्यासाठी त्याने आता राहते घरच विकायला काढले  आहे. मुदलापेक्षा जादा व्याज घेता येत नाही. तरीही आत्तापर्यंत त्याने मुदलाच्या चारपट व्याज दिले आहे.