Sun, Jul 21, 2019 00:01होमपेज › Sangli › कुपवाड एमआयडीसीत ट्रक पलटी होऊन एक ठार

कुपवाड एमआयडीसीत ट्रक पलटी होऊन एक ठार

Published On: Jan 21 2018 2:54AM | Last Updated: Jan 21 2018 12:19AMकुपवाड : वार्ताहर 

कुपवाड एमआयडीसीतील पाण्याच्या टाकीसमोरील रस्त्यावर कुपवाड एमआयडीसीत भरधाव वेगाने जाणारा  ट्रक  चालत जाणार्‍या  श्रीकृष्ण रामचंद्र कदम ( वय 40, रा. सोमवार पेठ, माधवनगर) यांच्या  अंगावर पलटी झाला. त्यामुळे ते जागीच ठार झाले. कुपवाड  पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन चालकास अटक केली आहे.  पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः मृत  कदम हे एमआयडीसीतील एका सुरक्षा रक्षक पुरविणार्‍या एजन्सीकडे रखवालदार होते. शनिवारी कामावर चालत   जात असताना भरधाव वेगाने जाणारा   ट्रक (  टी .एन. 56/एफ 6089 ) पलटी झाला. त्यात ते जागीच ठार झाले.  ट्रकचालक गणेशन ए. अरुणाचलम (रा. गोविंदवाडी सेलम, तामिळनाडू ) याला अटक केली आहे.