Fri, Feb 22, 2019 03:41होमपेज › Sangli › सांगलीः मिरजेत ५ एसटी गाड्या फोडल्या 

सांगलीः मिरजेत ५ एसटी गाड्या फोडल्या 

Published On: Jan 02 2018 1:28PM | Last Updated: Jan 02 2018 1:28PM

बुकमार्क करा
मिरज : प्रतिनिधी 

भीमा कोरेगाव येथे दगडफेक व वाहने जाळल्याच्या निषेधार्थ मिरज शहरात ५ एस. टी. गाड्या फोडण्यात आल्या आहेत. 

मिरज-संतोषवाडी मुक्कामी जाणाऱ्या (एमएच १२ इएफ ६४९६) गाडीवर रात्री ९ वाजता दगडफेक करून पुढच्या व मागच्या काचा फोडण्यात आल्या. तर मिरज शहर बस स्थानकात लावण्यात आलेल्या एमएच १४ बीटी १०७८, एमएच १४ बीटी ९९८, एमएच १४ बीटी १०२१ व एमएच ४० व्हाय ५०७१ या शहरी बस गाड्यांवर १० ते १५ जणांच्या जमावाने रात्री १२ वाजता दगडफेक करून समोरील काचा फोडल्या. 

सदर दगडफेकीत एस. टी. महामंडळाचे सुमारे ५५ हजारांहून अधिक नुकसान झाले असल्याचे आगार प्रमुख बी. बी. नाईक यांनी सांगितले.