होमपेज › Sangli › पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल २२ पासून

पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल २२ पासून

Published On: Dec 03 2017 1:25AM | Last Updated: Dec 02 2017 10:21PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

दैनिक ‘पुढारी’ टोमॅटो एफ. एम. तर्फे 22 ते 26 डिसेंबर या कालावधीत आर. व्ही. ग्राऊंड, बावडा रोड, राजहंस प्रिंटींग प्रेस समोर, नागाळा पार्क येथे ‘पुढारी शॉपिंग अ‍ॅण्ड फूड फेस्टिव्हल 2017’ चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक रॉनिक वॉटर हिटर सिस्टीम आणि पितांबरी रुचियाना हे आहेत. चमचमीत खाद्यपदार्थांसोबत दर्जेदार कंपन्यांची उत्पादने, भरघोस सवलती आणि मनमुराद खरेदीचा आनंद कोल्हापूरकरांना फेस्टिव्हलमध्ये घेता येणार आहे.

नाताळ सण आणि नवीन वर्षाच्या उत्साही वातावरणाचा पुरेपूर आस्वाद लोकांना घ्यावा, या उद्देशाने हा फेस्टिव्हल होत आहे. सणानिमित्त अनेकजण खरेदीचा बेत आखतात, पण बर्‍याच वेळेला बाजारातील गर्दी आणि वाहतुकीची होणारी कोंडी यामुळे मनासारखी खरेदी होत नाही. ही खंत नेहमीच मनात राहते. याचाच विचार करून दैनिक ‘पुढारी’ टोमॅटो एफ. एम. तर्फे ‘पुढारी शॉपिंग अ‍ॅण्ड फूड फेस्टिव्हल’चे आयोजन केले आहे. फेस्टिव्हलमध्ये मनासारखी खरेदी तर होईलच शिवाय खरेदीवर ऑफर्सचा लाभही घेता येणार आहे. खरेदीनंतर चमचमीत शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांवर तावही मारता येणार आहे. फेस्टिव्हलमध्ये 100 हून अधिक स्टॉलची विविधता एकवटली आहे.

कुटुंबासाठी लागणार्‍या छोट्या-मोठ्या गृहोपयोगी वस्तूंचा समावेश फेस्टिव्हलमध्ये असेल. याशिवाय वॉशिंग मशीन, गॅस शेगडी, लोणची, इन्स्टंट रांगोळी, व्यायामाचे साहित्य, इमेटिशन ज्वेलरी, फॅन्सी ड्रेस, आयुर्वेदिक हेल्थकेअर उत्पादने, सौंदर्यप्रसाधने, मसाल्यांचे पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ, प्लास्टिकच्या वस्तू, अगरबत्ती, रिलॅक्स चेअर आदी बरेच काही येथे उपलब्ध असणार आहे.चमचमीत बिर्याणी अन् बरंच काही येथे उपलब्ध असणार आहे.

मांसाहारीमध्ये कोल्हापूर झणझणीत तांबडा-पांढरा रस्सा, वडा कोंबडा, बिर्याणी, खांडोळी, चिकन बिर्याणी, कबाब, किचन, लॉलीपॉप, तंदूर, चिकन-65, मटण ताट, खिमा, फिश मंच्युरियन 
शाकाहारीमध्ये पिझ्झा, बर्गर, डोसा, उताप्पा, गोबी मंच्युरियन, भेल, पाणीपुरी, सँडवीच, पप्स, चीज, झुणका-भाकर, व्हेज पुलाव, सोलकढी, आईस्क्रिम आदी चमचमीत पदार्थांचे स्टॉलही फेस्टिव्हलमध्ये असणार आहेत. फेस्टिव्हलच्या अधिक माहितीसाठी आणि स्टॉल बुकिंगसाठी  प्रदीप 9765566604, अमोल 9765566377,  सनी 9765566413 आणि, तसेच फूड स्टॉलसाठी 8805007724  या मोबाईल क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.