होमपेज › Sangli › चाकूच्या धाकाने दाम्पत्यास लुबाडले

चाकूच्या धाकाने दाम्पत्यास लुबाडले

Published On: Feb 14 2018 1:55AM | Last Updated: Feb 13 2018 11:51PMसांगली : प्रतिनिधी

महाशिवरात्रीनिमित्त हरिपूरला  दर्शनासाठी निघालेल्या दाम्पत्यास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवून लुबाडले. पहाटेच्या वेळी हरिपूर रस्त्यावर हा प्रकार घडला. याबाबत सुरेखा अप्पाण्णा तिमगोळ (वय 45, रा. अष्टविनायक कॉलनी, माधवनगर) यांनी   सोन्याचे दागिने आणि रोख रक्‍कम असा सुमारे 31 हजार रुपयांचा मुद्देमाल गेला असल्याची फिर्याद सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेली

माहिती अशी : सुरेखा आणि त्यांचे पती अप्पाण्णा हे दोघे दुचाकीवरून हरिपूरला   निघाले होते. त्यावेळी दुचाकीवरून दोघे अज्ञात चोरटे भरधाव वेगात पाठीमागून आले. त्यांनी तिमगोळ यांच्या दुचाकीच्या आडवी गाडी  नेली. दुचाकी थांबवण्यास भाग पाडले. त्यानंतर दुचाकीवर पाठीमागे बसलेल्याने चाकूचा धाक दाखवत सुरेखा यांच्या गळ्यातील 22 हजार रुपयाचे मंगळसूत्र, 8 हजार रुपयांच्या रिंगा काढून घेतल्या.  अप्पाण्णा यांच्या खिशातील रोख 400 रुपये घेतले.

त्यांना धमकावून दोघेही चोरटे भरधाव वेगात पसार झाले.  चोरट्यांच्या तोंडाला कापड बांधलेले होते. या दाम्पत्याने आरडाओरडा केला. मात्र, चोरटे गायब झाले होते.