Mon, Nov 19, 2018 17:04



होमपेज › Sangli › तरुणावरील चाकूहल्ला प्रकरणी कुपवाडमधील एकास अटक 

तरुणावरील चाकूहल्ला प्रकरणी कुपवाडमधील एकास अटक 

Published On: Jan 18 2018 1:45AM | Last Updated: Jan 18 2018 12:14AM

बुकमार्क करा




कुपवाड : वार्ताहर

शहरातील ईश्वर तातोबा बंडगर (वय 35, रा. कापसे प्लॉट) या तरुणावर चाकूहल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी  संशयित आरोपी ओंकार किशोर सगरे (वय 30, रा. शालिनीनगर, कुपवाड) याला कुपवाड पोलिसांनी अटक केली आहे. 

रविवारी (दि. 14) या दोघांत बराचवेळ झटापटही झाली. ओंकार सगरेने ईश्वरच्या उजव्या खांद्यावर व पाठीवर दोन खोलवर चाकूचे  वार केले  होते. यामुळे प्रचंड रक्तस्राव होऊन ईश्वर गंभीर जखमी झाला. जखमी ईश्वरला उपचारासाठी तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. संशयित ओंकार सगरेच्या विरोधात जखमी बंडगरने फिर्याद दिली होती. गुन्हा घडल्यानंतर तीन दिवस फरारी असलेल्या संशयित ओंकार सगरेला गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी शालिनीनगर परिसरात सापळा रचून मंगळवारी मध्यरात्री त्याला  अटक केली.