Sat, Feb 23, 2019 06:01होमपेज › Sangli › सांगलीतील तांदूळ व्यापार्‍याचे दिल्लीत अपहरणनाट्य

सांगलीतील तांदूळ व्यापार्‍याचे दिल्लीत अपहरणनाट्य

Published On: Dec 13 2017 1:58AM | Last Updated: Dec 13 2017 12:40AM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

शहरातील एका प्रसिद्ध तांदूळ व्यापार्‍याचे दिल्लीत अपहरण झाल्याच्या वृत्ताने शहरात खळबळ उडाली. अपहरणकर्त्यांनी व्यापार्‍याच्या घरी त्याच्याच मोबाईलवरून फोन करून 12 लाखांची खंडणीही मागितली होती. याबाबत गुन्हा दाखल करायची तयारीही करण्यात आली होती. मात्र मंगळवारी सकाळी व्यापार्‍याने घरी फोन करून आपण सुखरूप असल्याचे कळविल्याने या अपहरणनाट्यावर पडदा 
पडला. 

सांगलीतील एक प्रसिद्ध तांदूळ व्यापारी खरेदीसाठी सोमवारी दिल्लीला गेले होते. पुण्यापर्यंत रेल्वेने तर तेथून दिल्लीला ते विमानाने गेले. तेथे गेल्यानंतर अज्ञातांनी त्यांचे मोटारीतून अपहरण केले. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्या व्यापार्‍याच्या घरी त्याच्याच मोबाईलवरून फोन करून अपहरण केल्याचे सांगितले. तसेच 12 लाखांची खंडणी मागितली. त्यानंतर घरच्या लोकांनी घाबरून तातडीने पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांची भेट घेतली. त्यांनी शहर पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेशही दिले होते. 

मात्र आज सकाळी त्या व्यापार्‍याने घरी फोन करून आपण अपहरणकर्त्यांकडून सुटका करून घेतल्याचे सांगितले. त्याशिवाय बुधवारपर्यंत सांगलीत येत असल्याचेही कळविले. त्यामुळे नातेवाईकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.