Sun, Jul 05, 2020 02:40होमपेज › Sangli › खुजगाव जलसेतूला गळती लाखो लिटर पाणी वाया (Video)

खुजगाव जलसेतूला गळती लाखो लिटर पाणी वाया (Video)

Published On: Jun 13 2019 2:57PM | Last Updated: Jun 13 2019 3:32PM
वारणावती : प्रतिनिधी 

खुजगाव (ता.शिराळा) येथील वारणेच्या जलसेतुला काल अचानक गळती लागली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. ऐन पावसाळय़ात मोठय़ा प्रमाणात गळती लागल्यामुळे आता ही गळती काढणार कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

चांदोली धरणातून शेतीसाठी कालव्यामार्फत पाणी सोडले जाते उन्हाळ्यामध्ये दर 15 दिवसांनी तर हिवाळ्यामध्ये दर एकवीस दिवसांनी या कालव्यामार्फत पाणी सोडले जाते .शेडगेवाडी व खुजगाव दरम्यान कोकरूड चांदोली रस्त्यावर वारणेचा जलसेतू आहे. खुजगाव जलसेतू म्हणून याला ओळखले जाते .कालपासून अचानक या जल सेतूला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाहून जात आहे .मुख्य रस्त्यावरूनच हा जलसेतू गेल्यामुळे गळती झालेले पाणी रस्त्यावर साचले आहे. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांनाही या पाण्याचा अडथळा होत आहे. गळती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याला धबधब्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्‍यामुळे येणारा जाणारा प्रत्येक वाटसरू या ठिकाणी थांबून छायाचित्रण करत आहे.