Sat, May 25, 2019 23:15होमपेज › Sangli › कुपवाडमध्ये विवाहितेला रॉकेल ओतून पेटविले

कुपवाडमध्ये विवाहितेला रॉकेल ओतून पेटविले

Published On: Apr 22 2018 1:13AM | Last Updated: Apr 21 2018 11:53PMकुपवाड : वार्ताहर

शहरातील सौ.सीमा राजू नाईक (वय 30, रा.दुर्गानगर) या विवाहित महिलेच्या अंगावर तिघांनी संगनमत करून रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. यात ती महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी तीन संशयिताना अटक केली आहे. 

अटक केलेल्या संशयितामध्ये मुख्य सूत्रधार सतीश शंकर शिंदे (वय 30, रा. दुर्गानगर), नितीन शंकर शिंदे (वय 25, रा. संजयगांधी झोपड़पट्टी, मिरज) व पोपट नानासाहेब शिंदे (39, रा.सिद्धेवाडी, ता.मिरज) या तिघांचा समावेश आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः शहरातील सौ. सीमा राजू नाईक हिने संशयित मुख्य आरोपी सतीश शिंदे याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली होती. सतीश व  नितीन दोघे सख्खे भाऊ आहेत.  पोपट त्यांचा नातलग आहे. संशयित  सतीश  व जखमी महिला  सीमा नाईक  हे दोघे मिरज  एमआयडीसीतील एका पॉवरलूम कंपनीत गेल्या दोन वषार्ंपासून एकत्र काम करत आहेत.

तेव्हापासून दोघांची ओळख वाढली होती. सीमा सध्या पतीपासून विभक्त राहत आहे. यातूनच सतीशने सीमासोबत सलगी वाढवली होती. त्यातच सीमा कंपनीतील इतर कामगारांसोबत बोलत असल्याचा सतीश  तिच्यावर संशय घेत होता. यावरून दोघात वारंवार खटके उडत होते. या त्रासातून तिने पोलिसात तक्रार दिली होती. कंपनीतील इतर कामगारासोबत बोलल्याचा संशय आणि पोलिसांत तक्रार दिल्याचा राग मनात धरून दि. 4 एप्रिलरोजी दुपारी दीड वाजता सतीश, नितीन व पोपट यांनी संगनमत केले.

सतीश व नितीन यांनी पोपटच्या घरातून रॉकेलचा कॅन आणून सीमाच्या घरी जाऊन ‘तू कंपनीतील इतर कामगाराशी का बोलतेस? आणि आमच्या विरोधात पोलिसात तक्रार का देतेस? असे  विचारुन तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. या घटनेत सीमा 50 टक्के भाजून गंभीर जखमी झाली. तिच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत जखमी महिलेने संशयित सतीश, नितीन   व पोपट या तिघांविरोधात कुपवाड पोलिसात तक्रार दिली आहे. तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहा.पो.निरीक्षक रुपाली कावडे तपास करीत आहेत.

Tags : sangli, Kupwad, marriage woman, burnt, sangli news,