Tue, Apr 23, 2019 19:36होमपेज › Sangli › बोरगावमध्ये उद्या शेतकरी मेळावा

बोरगावमध्ये उद्या शेतकरी मेळावा

Published On: Dec 16 2017 1:48AM | Last Updated: Dec 15 2017 9:15PM

बुकमार्क करा

कवठेमहांकाळ : प्रतिनिधी

अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिरढोण-बोरगावमधील ज. म. करपे हायस्कूलच्या मैदानावर रविवारी (दि. 17) होणार्‍या या मेळाव्यास शेतकरी नेते अजित नवले मार्गदर्शन करणार असल्याची माहिती किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ. दिगंबर कांबळे यांनी दिली.

सरसकट कर्जमाफी करावी. शेतीमालाला हमीभाव मिळण्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य कराव्यात, चुकीच्या पद्धतीने होणारे जमीन अधिग्रहण बंद करावे, रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठीच्या जमिनीचे अधिग्रहण बंद करावे, यासह अन्य मागण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कॉ. नवले यांच्यासह धनाजी गुरव, नामदेव करगणे यांच्या उपस्थितीत आणि  उमेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होणार आहे. रविवारी सकाळी 11 वाजता होणार्‍या या मेळाव्यास शेतकर्‍यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कांबळे यांनी केले आहे.