Wed, Jan 23, 2019 11:12होमपेज › Sangli › इस्लामपुरात आजपासून शॉपिंग अ‍ॅण्ड फूड फेस्टिव्हल

इस्लामपुरात आजपासून शॉपिंग अ‍ॅण्ड फूड फेस्टिव्हल

Published On: May 04 2018 1:50AM | Last Updated: May 03 2018 11:22PMइस्लामपूर : वार्ताहर

दै. पुढारी कस्तुरी क्लब व प्रतिराज युथ फाऊंडेशनच्यावतीने आयोजित  ‘कस्तुरी खाद्य खरेदी धमाल’ या फेस्टिव्हलला शुक्रवार (दि. 4) पासून येथे सुरुवात होत आहे. महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 

दै. पुढारी कस्तुरी क्लबने वर्षभर सभासद महिलांसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या शॉपिंग व फूड फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्य प्रायोजक प्रतिराज युथ फाऊंडेशन आणि सहप्रायोजन शाल्वी एंटरप्राईझेस तसेच जय हनुमान पतसंस्था, रिवो वॉटर टँक आणि झी मराठी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. 

दि. 4,  5 व 6 मेपर्यंत चालणार्‍या या फेस्टिव्हलला झी मराठी वाहिनीचे कलाकार उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवात खा द्यमेजवानीबरोबरच खरेदीचीही संधी ग्राहकांना मिळणार आहे. स्टॉल उभारण्याचा शुभारंभ राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष, नगरसेवक शहाजीबापू पाटील, नगरसेवक खंडेराव जाधव यांच्याहस्ते करण्यात आला आहे. हमीद लांडगे, सागर जाधव, गुरूदत्त देसावळे, संयोजिका मंगल देसावळे उपस्थित होते. शुक्रवारी सायंकाळी झी टॉकीजवरील ‘लागीरं झालं जी’ मालिकेतील अजिंक्य व शीतल यांच्या उपस्थितीत या फेस्टिव्हलची सुरुवात होणार आहे. शनिवारी अभिनेते डॉ. अमोल कोल्हे व अभिनेत्री पल्लवी वैद्य यांची प्रकट मुलाखत मयुरी वाघ घेणार आहेत. रविवारी मिस व मिसेस कस्तुरी स्पर्धा व फॅशन शोचे आयोजन केले आहे. महोत्सवाला सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. संपर्क : 8805023883, 8805024242.