Thu, Apr 25, 2019 14:20होमपेज › Sangli › जलयुक्तचा जलवा

जलयुक्तचा जलवा

Published On: Jun 16 2018 10:47PM | Last Updated: Jun 16 2018 10:19PMपडीक जमीन झाली बागायती

रज तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कृषी, लघुसिंचन, पंचायत समिती व यांत्रिक विभागातर्फे गेल्या तीन वर्षात 14 कोटी 59 लाख 76 हजार 509 रुपये खर्च करुन 43 गावांत ओढा पात्राचे खोलीकरण व रुंदीकरण केले आहे. या कामांमुळे सुमारे 9 हजार टीसीएम पाणीसाठा झाला आहे. यामुळे पाण्यापासून वंचित असलेली जमीन बागायती झाली आहे.

जलयुक्त शिवारची कामे आणि म्हैसाळ योजनेमुळे मिरज पूर्व भागात कूपनलिका व विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तालुक्यात पूर्व भागातील सर्व 43 गावांत झालेल्या या कामांमुळे  द्राक्षे, आंबा  व अन्य बागायत पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. तसेच स्वीट कॉर्न आणि बेबी कॉर्न या पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. 

तालुक्यात 2015-16 मध्ये 7 कोटी 37 लाख 8 हजार 20 रुपये    खर्चून एरंडोली, खंडेराजुरी, पाटगाव, भोसे, मानमोडी, सोनी, करोली एम, कळंबी, सिध्देवाडी, कानडवाडी, तानंग, खटाव व डोंगरवाडी या गावांत 284 कामे पूर्ण झाली आहेत.2016-17 मध्ये लक्ष्मीवाडी, आरग, लिंगनूर, संतोषवाडी, शिपूर, पायापाचीवाडी, कदमवाडी, बेळंकी, जानराववाडी, टाकळी, बोलवाड, गुंडेवाडी, बेडग, मल्लेवाडी, कांचनपूर, काकडवाडी व मालगाव या गावांमध्ये 6 कोटी 39 लाख 63 हजार 489 रुपये खर्चून एकूण 57 कामे झाली आहेत. 2017-18 मध्ये सावळी, शिंदेवाडी, नरवाड, कवलापूर, रसुलवाडी, सांबरवाडी, बुधगाव, बिसूर, खोतवाडी, वाजेगाव, चाबूकस्वारवाडी व सलगरे या गावांत 83 लाख रुपये खर्चून 103 कामे पूर्ण केली आहेत. या 43 गावांत जलसाठवणुकीच्या कामामुळे दरवर्षी सुमारे 9 हजार टीसीएम पाणीसाठा  वाढला आहे.

जे. ए. पाटील


शिवार पाणीयुक्तलयुक्त शिवार अभियानांतर्गत वाळवा तालुक्यात दोन वर्षात 11 कोटी रुपयांची 876 कामे पूर्ण झाली आहेत. अनेक गावांना या अभियानाचा चांगलाच लाभ झाला आहे. भूजल पातळी वाढल्याने यावर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईचा फारसा सामना करावा लागला नाही. 

18 गावांचा समावेश

2016-17 मध्ये तालुक्यातील 18 गावांचा या अभियानात समावेश करण्यात आला. त्यामध्ये मरळनाथपूर, ओझर्डे, काळमवाडी, सुरूल, रेठरेधरण, माणिकवाडी, शेखरवाडी, जक्राईवाडी, कार्वे, ऐतवडे बुद्रूक, ढगेवाडी, मर्दवाडी, कारंदवाडी, गाताडवाडी, वाघवाडी, पेठ, जांभुळवाडी, शिवपुरी या गावांचा समावेश आहे. यावर्षी नव्याने वशी, डोंगरवाडी, शेणे या तीन गावांचा समावेश झाला. 

2 वर्षात 18 कोटी खर्च

2016-17 मध्ये या 18 गावातून कृषी विभाग, सामाजिक वनीकरण, वन विभाग, ग्रामविकास, लघुसिंचन विभाग, छोटे पाटबंधारे विभाग, भूजल सर्वेक्षण, यांत्रिकी विभाग, महसूल या विभागामार्फत 305 कामे पूर्ण झाली.  यावेळी 4 कोटी 28 लाख रुपये खर्च झाला. 2017-18 मध्ये 580 कामांना मंजुरी  मिळाली आहे. त्यातील 571 कामे पूर्ण झाली आहेत. त्यावर 6 कोटी 50 लाख रुपये खर्च झाला आहे. उर्वरित कामे 25 मे पर्यंत पूर्ण करणार असल्याचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी सांगितले.

नव्या 3 गावांत लवकरच कामे 

नव्याने समावेश झालेल्या तीन गावातून ग्रामसभा घेऊन या गावात करण्यात येणार्‍या कामाचा आराखडा तयार करण्यात येत असल्याचे तालुका कृषी अधिकारी माने यांनी सांगितले. आत्तापर्यंत जलयुक्त शिवार योजनेतून तलावातील गाळ काढणे, बंधारे बांधणे, ओढे अतिक्रमणमुक्त करून रुंदीकरण करणे, रोप लागवड, शेततळे आदी कामे पूर्ण झाली आहेत. अनेक गावातील तलावातील गाळ काढल्याने पावसाळ्यात हे तलाव तुडुंब भरले. त्यामुळे भूजल पातळीत वाढ झाली. परिणामी उन्हाळ्यात अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला नाही.  

मारूती पाटील

दुष्काळाची दाहकता घटली

लयुक्त शिवार योजनेमुळे जत तालुक्यातील दुष्काळाची दाहकता काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे. अनेक गावे पाणीदार होत आहेत. ही योजना कायमस्वरुपी सुरू ठेवल्यास तालुक्याचा दुष्काळाचा कलंक काहीप्रमाणात पुसण्यास मदत होईल. 

तालुक्यातील 2015-2016 मध्ये 42 गावे, 2016-2017 मध्ये 30 गावे,  2017 -2018 मध्ये 30 अशा एकूण 102 गावात जलयुक्त शिवार योजना राबवली आहे. तालुक्यातील सरासरी 80 टक्के  हून अधिक कामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित कामे सुरू आहेत. काही प्रस्तावित आहेत.  

तालुक्यात 2015 -2016 मध्ये विविध प्रकारच्या 1543 जलसंधारण च्या कामांसाठी 3178.35 लाख रुपये निधी खर्च केला आहे. यातून  अंदाजित 5470 टीसीएम पाणीसाठा होणार आहे. 2016 -2017 मध्ये 1309 कामांवर 2605.76 लाख रुपये निधी खर्च केला आहे. तर 2017-2018 मध्ये 1903 कामासाठी 254.11 लाख निधी मिळाला आहे. यातील काही कामे अपूर्ण आहेत. एकूण कामांपैकी 85 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. जलयुक्त शिवार या योजनेतून जलसंधारणची कामे झाल्यामुळे अनेक गावात जमिनीतील पाणीसाठा वाढला आहे. याचा फायदा शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे. भविष्यात सिमेंट बंधारे, नाला सरळीकरण, खोलीकरण, समतल चर यासारखी कामे झाल्यास टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण होणार नाही. 

विजय रुपनूर

द्राक्षबागांना आधार

ष्काळाने हवालदिल झालेल्या जनतेसाठी आशेचा किरण असलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणीत तासगाव तालुक्याने बाजी मारली आहे. गेल्या तीन वर्षांत तालुक्यातील 51 गावांत योजनेची 1 हजार 294 कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित 17  गावांत  कामे जोमाने सुरू आहेत. यासाठी सुमारे 24 कोटी 50 लाख रुपये खर्च केले आहेत. याचा फायदा पिण्याच्या पाण्याची पातळी वाढण्यास होणार आहे. जवळपास 10 हजार हेक्टर शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. 

13 शासकीय योजनांचे एकात्मीकरण असलेल्या या योजनेत साखळी बंधार्‍यांसह नाला खोलीकरण व रुंदीकरण, पाणलोट विकास, जुन्या जलसंरचनांचे पुनरुज्जीवन, लघु पाटबंधारे कामांची दुरुस्ती, नूतनीकरण, नव्या-जुन्या सर्व प्रकारच्या छोट्या तलावांतून गाळ काढणे, मध्यम व मोठ्या प्रकल्पांची सिंचन क्षमता वापरात येण्यासाठी उपाययोजना करणे,  छोटे नाले - ओढे जोड  प्रकल्प, विहीर व बोअरवेल पुनरुज्जीवन, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर, पाण्याचे स्रोत बळकटीकरण, पाणी वापर संस्था सक्षमीकरण व कालवा दुरुस्ती ही कामे एकात्मिक पध्दतीने करण्यात आली आहेत. 

योजना सुरू झाल्यानंतर पहिल्या वर्षी 2015-16 ला मतकुणकी, वासुंबे, लोढे,  सावर्डे, वाघापूर, चिंचणी, धुळगाव, हातनूर, पेड, कचरेवाडी, विसापूर, डोंगरसोनी, लोकरेवाडी, सावळज, दहिवडी,  नागेवाडी, मांजर्डे, बलगवडे, गौरगाव, मोराळे (पेड), वायफळे, खुजगाव, बस्तवडे, आरवडे या 24 गावांत योजनेची कामे झाली.

दुसर्‍या वर्षी 2016-17 ला वडगाव, पुणदी, हातनोली, धोंडेवाडी, पाडळी, नरसेवाडी, विजयनगर, वज्रचौंडे, मणेराजुरी, गोटेवाडी, सिध्देवाडी, जरंडी या 12 गावात जलसंधारणाची कामे पूर्ण झाली.  तिसर्‍या वर्षी 2017 - 18 ला कौलगे, कुमठे, कवठेएकंद, नागाव (कवठे), उपळावी, वंजारवाडी, बोरगाव, लिंब, डोर्ली, यमगरवाडी, योगेवाडी, धामणी, किंदरवाडी, भैरववाडी, आळते या 15 गावामध्ये शेततळी काढणे, नाला खोलीकरण व रुंदीकरण यासह विहीर आणि बोअर पुर्नभरणची कामे झाली आहेत. 

2018 -19 या चालू वर्षांत जुळेवाडी, राजापूर, तुरची, येळावी, चिखलगोठण, ढवळी, नागाव (निमणी), नेहरूनगर, निमणी, निंबळक, पानमळेवाडी, शिरगाव (क), शिरगाव (वि), तासगाव, बेंद्री, अंजनी, बिरणवाडी या उर्वरित 17 गावामध्ये योजनेची कामे जोमाने सुरू आहेत.             

प्रशासनाच्या एकीचे फळ 

तासगाव तालुक्याने जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबवली हे सर्व यंत्रणांच्या एकीच्या बळाचे फळ आहे. तहसीलदार सुधाकर भोसले, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण जाधव, तालुका कृषी अधिकारी राजाराम शिंदे,

पाटबंधारे विभागाचे अथर्व गोसावी आणि वन विभागाचे अधिकारी एकमेकांशी समन्वय ठेवत जलसंधारणासाठी राबले. त्यामुळेच तालुक्यातील शिवारे जलयुक्त झालेली पहायला मिळत आहेत.
दिलीप जाधव


पाणीच-पाणी 

णी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने 2014-15 मध्ये जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. या योजनेंतर्गत कडेगाव  तालुक्यात मागील तीन वर्षात 21 गावांमध्ये जलयुक्त शिवाराची सुमारे 1 कोटी 10 लाख रुपयांची विविध कामे झाली आहेत. यामध्ये सिमेंट बंधारे बांधणे, जुन्या बंधारांची दुरुस्ती, बंधार्‍यातील गाळ काढणे या प्रकारची कामे झाली आहेत. त्यामुळे याचा चांगलाच फायदा पाणी साठवण क्षमतेला झाला आहे. तसेच टेंभू आणि ताकारी सिंचन योजनेचे पाण्याचे आवर्तन सुरू झाल्याने त्याचा चांगलाच लाभ जलयुक्त शिवार योजनेला झाला आहे.2018-19 साठी निमसोड या गावाची जलयुक्त शिवार योजनेंतर्गत निवड झाली आहे. या गावचा सर्वे पूर्ण झाला आहे. पण या ठिकाणी काम सुरू झाले नाही. लवकरच या ठिकाणी या योजनेंतर्गत कामे सुरू होतील, अशी माहिती तालुका कृषी खात्याकडून देण्यात आली.

तालुक्याचे  एकूण भौगोलिक  क्षेत्र 58 हजार 56 हेक्टर आहे. पडीक जमीन सर्वसाधारणपणे 6 हजार हेक्टर क्षेत्र आहे. पिकाऊ जमीन 50 हजार हेक्टर आहे. हा तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील पाणी टंचाई दूर होण्यासाठी जलयुक्त शिवार योजने अंतर्गत तालुक्यात 2015-16 मध्ये बोंबाळवाडी, ढाणेवाडी, खेराडे-विटा, खेराडे-वांगी, हिंगणगाव खुर्द, चिंचणी, अंबक, शिरसगाव या नऊ गावांचा समावेश करण्यात आला होता. या नऊ गावात सुमारे 80 लाखांची कामे झाली आहेत. 2016-17 मध्ये नेवरी, येतगाव, अमरापूर, कडेगाव, कडेपूर, तडसर या सहा गावांत 10 लाखांची कामे पूर्ण झाली आहेत. 2017- 18 मध्ये शिरसगाव, नेर्ली, कोतवडे, उपाळे मायणी, चिखली, बेलवडे या सहा गावांमध्ये 17 लाख रुपयांचे गाळ काढण्याचे काम झाले आहे. 2015-16, 2016-17 आणि 2017-18 मध्ये एकूण कृषी खात्याकडून 1 कोटी 10 लाखांची कामे झाली आहेत. यामध्ये सिमेंट बंधारे, दुरुस्ती, बंधार्‍यातील गाळ काढणे या प्रकारची कामे करण्यात आली आहेत.

तालुक्यात टेंभू आणि ताकारी व आरफळ योजना कार्यान्वित झाल्याने याचा शेतीसाठी चांगला लाभ झाला आहे. अशा परिस्थितीत गेल्या वर्षी 2017-18 मध्ये तालुक्यातील शिरसगावसह अन्य पाच गावांचा समावेश करण्यात आला. या योजनेंतर्गत गेल्या वर्षी सुमारे 17 लाख रुपयांचे गाळ काढण्याचे काम झाले आहे. त्यामुळे या गावांमध्ये पाणी साठवण क्षमतेत पूर्वीपेक्षा वाढ झाली आहे. या योजना ज्या गावामंध्ये राबवण्यात आल्या अशा बहुतांश गावांमध्ये पाणी टंचाई दूर होण्यास मदत झाली आहे. शिरसगाव येथे या योजनेअंतर्गत सुमारे 2 कोटी 92 लाखांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

रजाअली पिरजादे

भटकंती 

थांबली    लयुक्त शिवारमुळे तालुक्यातील गेल्या दोन वर्षांच्या काळात 32 गावे जलसमृध्द  होण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्यात गेल्या दोन वर्षात 1 हजार 300 कामे केली आहेत. पाणी अडविण्यासाठी आणि जिरवण्यासाठी या कामांचा मोठा फायदा होणार आहे. नाल्यांच्या खोलीकरणामुळे पाणीसाठा वाढणार आहे. त्याचबरोबर कंपार्टमेंट बंडिंग, समतल चारीमुळे पाणी जिरणार आहे. 2016-17 मधील 669 कामासाठी 9 कोटी 43 लाख रुपये खर्च केले आहेत, मात्र 17-18 मधील 652 कामे अद्याप पूर्ण झाली नाहीत. बहुतांशी कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू आहे.

जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात तालुक्याने आघाडी घेतली आहे. 2016-17 मध्ये 32 आणि 17-18 मध्ये 32 गावांची निवड करण्यात आली. या गावांमध्ये पाणीसाठा वाढविण्यासाठी आणि पाणी जिरविण्यासाठी उपाय करण्यात आले. दोन वर्षात शेततळी, नाला खोलीकरण, कंपार्टमेंट बंडिंग, समतल चरी काढण्यावर भर देण्यात आला आहे. घोरपडी, शिंदेवाडी, जाखापूर, रांजणी, ढालेवाडी, लोणारवाडी, दुधेभावी, आगळगाव, चोरोची, तिसंगी, कोकळे, करलहट्टी, जांभुळवाडी, अलकुड एस, ढालगाव, वाघोली या तर यंदा बोरगाव, नांगोळे, कुची, नागज, शिरढोण, खरशिंग, कुंडलापूर, इरळी, धुळगाव, निमज, लंगरपेठ, अलकुड, केरेवाडी, शेळकेवाडी, कदमवाडी, आरेवाडी या गावात कामे केली आहेत.

दोन वर्षातील कामांसाठी 18 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यातून 1321 कामे केली जाणार आहेत. त्यापैकी गेल्या वर्षी 669 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यंदाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची घाई सुरू आहे. नाला खोलीकरणाची कामे चांगल्या पध्दतीने झाली आहेत. त्यामुळे पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. 

गोपाळ पाटील