Thu, Aug 22, 2019 08:34होमपेज › Sangli › बेशिस्त वाहनांना  आता ‘के्रन’चा ब्रेक!

बेशिस्त वाहनांना  आता ‘के्रन’चा ब्रेक!

Published On: Jan 22 2018 1:23AM | Last Updated: Jan 21 2018 10:08PMइस्लामपूर : प्रतिनिधी

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नुकतीच विना परवाना उभी केलेली  वाहने उचलण्यासाठीची क्रेन कार्यान्वित झाली आहे. बेशिस्त व नियमांविरुद्ध पार्किंग केलेल्या वाहनधारकांना कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. बेशिस्त वाहन पार्किंग करणार्‍यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. मोटार वाहन कायद्याची तात्काळ अंमलबजावणी व बेशिस्त वाहनधारकांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. 

पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी इस्लामपूर यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे नुकतीच वाहतूक नियंत्रण शाखा इस्लामपूर व इस्लामपूर नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने इस्लामपूरसाठी क्रेन चालू केलेली आहे.

इस्लामपूर शहरातील व इस्लामपूर शहरात बाहेर गावाहून येणार्‍या सर्व लोकांनी आपली वाहने मोटारसायकली, चारचाकी वाहने ही शहरातील रोडवरील पार्किंग, समविषम पार्किंगचे बोर्ड पाहूनच आपली वाहने पार्किंग करावीत, इतर ठिकाणी वाहने रहदारीस अडथळा करताना मिळून आली तर सदरची वाहने क्रेनने उचलून नेवून मोटर वाहन कायद्याप्रमाणे योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. वाहनधारकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. 

बेशिस्त वाहन पार्किंग करणार्‍या सर्व वाहन चालकाविरुद्ध विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर काळे, पोलिस निरीक्षक प्रताप मानकर इस्लामपूर व सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिला आहे.