होमपेज › Sangli › इस्लामपुरात राष्ट्रवादीचे पकोडे बेचो आंदोलन

इस्लामपुरात राष्ट्रवादीचे पकोडे बेचो आंदोलन

Published On: Feb 18 2018 10:42PM | Last Updated: Feb 18 2018 10:31PMइस्लामपूर : प्रतिनिधी

वाळवा तालुका विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राजारामनगर येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (आरआयटी) च्या समोर पकोडे बेचो आंदोलन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या विधानाचा निषेध व्यक्त केला.

 जबाबदार व्यक्तींनी बेजबाबदार व्यक्तव्ये केल्यास माजी मंत्री आ.जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करू, असा इशारा तालुकाध्यक्ष विशाल सूर्यवंशी यांनी दिला.देशाचे पंतप्रधान मोदी  व भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी बेरोजगार तरुणांनी पकोडे विकण्याचा रोजगार करावा, असे विधान केले होते. ही देशातील बेरोजगार युवकांची चेष्टा आहे, अशी संतप्त भावना युवकांनी व्यक्त केली. मोदी यांनी आम्ही दरवर्षी देशातील 2 कोटी युवकांना रोजगार देवू, अशी ग्वाही दिली होती. गेल्या  4 वर्षात 8 कोटी युवकांना रोजगार मिळायला हवा होता. हा रोजगार देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. उलट सध्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप, एसटी पास, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्‍न गंभीर बनले आहेत.  या सरकारची आश्‍वासने म्हणजे बोलाचीच कढी असल्याची टीका विद्यार्थ्यांनी केली. या पकोडे बेचो आंदोलनात उपाध्यक्ष प्रवीण पाटील, संग्राम पाटील, सरचिटणीस लखन पवार, युवती अध्यक्षा प्रज्ञा पाटील, आरआयटी अध्यक्ष अक्षय सूर्यवंशी,  सुजय पोळ,मोहन भिंगार्डे, अनिरुद्ध पाटील, प्रशांत जाधव,  कार्तिक नलवडे, अक्षय भांबुरे, सचिन पाटील, मोहित पाटील, आशिष वाकळे तसेच कॉलेजचे व संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.