Sun, Apr 21, 2019 04:30होमपेज › Sangli › काँग्रेस इच्छुकांच्या आज, उद्या मुलाखती

काँग्रेस इच्छुकांच्या आज, उद्या मुलाखती

Published On: Jun 30 2018 1:19AM | Last Updated: Jun 29 2018 9:02PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे उमेदवारीस इच्छुक उमेदवारांच्या  मुलाखती सांगलीत शनिवार, दि. 30  व मिरजेत  रविवार (दि. 1) अशा दोन दिवस चालणार आहेत. या मुलाखती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री सतेज पाटील यांच्यासह कोअर कमिटी घेणार आहेत, अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली.दरम्यान इच्छुकांनी मुलाखतींच्या वेळी मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शनाची तयारी केली आहे.

ते म्हणाले, निवडणुकीसाठी कांँग्रेसकडून इच्छुुकांची संख्या जादा आहे. तब्बल 225 अर्जांची विक्री झाली आहे. त्यापैकी 180 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. आणखी 100 जणांचे अर्ज दाखल होतील. ज्यांनी पक्षाकडे अर्ज दाखल केले आहेत. त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे.   शनिवारी  सांगलीतील सर्व व कुपवाडच्या प्रभाग एकमधील काही उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत.  या मुलाखती कच्छी भवन येथे सकाळी 11 ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहेत.  रविवारी मिरजेतील सर्व व कुपवाडमधील प्रभाग क्रमांक दोनच्या इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. या मुलाखती पटवर्धन हॉल येथे होतील.

त्यांनी सांगितले की, मुलाखतींसाठी प्रदेश काँग्रेसने कोअर कमिटी नेमली आहे. तीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सतेज पाटील, अभय छाजेड,  जिल्हाध्यक्ष  आमदार मोहनराव  कदम, आ. विश्वजित कदम, माजी केंद्रीय राज्य मंत्री प्रतीक पाटील,  काँग्रेस नेत्या जयश्री पाटील आणि  मी आहे. ही  कमिटी  इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहे. मुलाखतीनंतर तुल्यबळ उमेदवारांची यादी केली जाईल.  ती प्रदेशकडे पाठविली जाईल. राज्यस्तरावरील नेत्यांची मान्यता मिळाल्यानंतर उमेदवारी अंतिम केली जाईल.