Thu, Apr 25, 2019 05:28होमपेज › Sangli › कुपवाडचे अपक्ष नगरसेवक गजानन मगदूम भाजपसोबत

कुपवाडचे अपक्ष नगरसेवक गजानन मगदूम भाजपसोबत

Published On: Aug 10 2018 12:59AM | Last Updated: Aug 09 2018 7:12PMसांगली : प्रतिनिधी

कुपवाडमधून (प्रभाग क्रमांक 2 ) निवडून आलेले अपक्ष नगरसेवक गजानन मगदूम यांनी बुधवारी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. त्यामुळे आता भाजपचे संख्याबळ 41 वरून 42 वर गेले. त्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपला पाठिंबा दिला. ना. पाटील  यांच्याहस्ते त्यांचा सत्कार केला.

श्री. मगदूम हे पूर्वीच्या सभागृहात काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक होते. परंतु त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडखोरी केली. अपक्ष  म्हणून निवडणूक लढविली होती. त्यांनी काँगे्रेस-राष्ट्रवादी आघाडी तसेच भाजपच्या उमेदवारांचा  पराभव केला होता. आज त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. कुपवाडच्या विकासासाठी भाजपसोबत जात असल्याचे त्यांनी सांगितले.आमदार सुधीर गाडगीळ, रवी अनासपुरे, माजी आमदार दिनकर पाटील, मकरंद देशपांडे, नीताताई केळकर, प्रदेश संघटक रघुनाथ कुलकर्णी, शेखर इनामदार आदी उपस्थित होते.