Tue, Apr 23, 2019 00:09होमपेज › Sangli › एकोणतीस वर्षे उद्घाटन करतो आहे : जयंत पाटील

एकोणतीस वर्षे उद्घाटन करतो आहे : जयंत पाटील

Published On: Aug 09 2018 1:37AM | Last Updated: Aug 08 2018 8:35PMइस्लामपूर : वार्ताहर

मी हौसेने हे पहिले उद्घाटन करीत नाही. गेली 29 वर्षे जनतेच्या आशीर्वादाने उद्घाटन करतो आहे. त्यामुळे श्रेयासाठी उद्घाटन करतो आहे, असे म्हणणार्‍यांची मला कीव वाटते, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी ना. सदाभाऊ खोत यांचा नामोल्लेख टाळून लगावला. साखराळे येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेचे भूमिपूजन तसेच बौध्दसमाजमंदिर, प्राथमिक शाळा खोल्यांची दुरुस्ती व रस्त्याच्या कामाचा आमदार पाटील यांच्याहस्ते प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर   जाहीर सभेत ते बोलत होते. 

काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, बाजार समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील, सभापती सचिन हुलवान, उपसभापती नेताजीराव पाटील उपस्थित होते. आमदार पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगाव तसेच सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या निकालावर ट्विट केले. मात्र, त्यांना महिला पत्रकार गौरी लंकेश यांची हत्त्या किंवा मराठा व धनगर समाजातील तरुण मुलांच्या आरक्षणासाठी आत्महत्त्या, याबद्दल ट्विट करायला वेळ नाही काय?  त्यांना केवळ निवडणुका  व त्यांचे निकालच महत्त्वाचे वाटतात काय? सरपंच बाबुराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. आनंदराव पाटील,  रंजना पाटील, बाळासाहेब पाटील, संग्राम पाटील, संजय पाटील, सुस्मिता जाधव आदी उपस्थित होते. उपसरपंच तजमुल चौगले यांनी आभार मानले. अमोल पाटील यांनी सूत्रसंचालन केले.