Tue, Apr 23, 2019 08:09होमपेज › Sangli › तासगाव पालिका पोटनिवडणूक  आठ उमेदवारी अर्ज दाखल

तासगाव पालिका पोटनिवडणूक  आठ उमेदवारी अर्ज दाखल

Published On: Mar 20 2018 1:50AM | Last Updated: Mar 19 2018 11:10PMतासगाव : शहर प्रतिनिधी

 नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहा ‘अ’ मधील पोटनिवडणुकीसाठी सोमवारी भाजप, राष्ट्रवादी आणि अन्य असे एकूण आठ अर्ज दाखल झाले.  या जागेसाठी  भाजप आणि राष्ट्रवादीत जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. अर्ज दाखल करायचा आज अखेरचा दिवस होता. राष्ट्रवादीच्या नगरसेविका रेहाना मुल्ला यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरवल्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द झाले होते. त्यामुळे रिकत झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी   शंकरराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली अर्ज दाखल प्रक्रिया पार पडली. एकूण आठ अर्ज दाखल झाले. ते असे : भाजपतर्फे तायरा कादर मुजावर, अफरोज ताजुद्दीन मुलाणी,राष्ट्रवादीतर्फे  सादिया हारुण शेख, आष्पाना सुहेब मुलाणी. अपक्ष आष्पाना सुद्दाम मुल्ला  व सुमन शंकर माळी. अर्जांची मंगळवारी  छाननी , दि. 26 मार्चपर्यंत अर्ज माघारी आणि दि. 6 एप्रिलला मतदान होणार आहे

 

tags :  tasgaon,news, municipal,election, nominations, bjp,ncp, fight,