Tue, Jul 14, 2020 09:44होमपेज › Sangli › सांगली : आरोग्य कर्मचाऱ्याला धमकी, सेविकेला मारहाण

सांगली : आरोग्य कर्मचाऱ्याला धमकी, सेविकेला मारहाण

Last Updated: Mar 26 2020 9:58AM

संग्रहित छायाचित्रसांगली : पुढारी वृत्तसेवा 

हिंगणगाव आरोग्य केंद्राचे आरोग्य सहायक यांना एका ग्रामपंचायत उपसरपंचांनी धमकी दिल्याप्रकरणी व बागणी आरोग्य केंद्रात कामावर जात असताना आरोग्य सेविकेच्या पतीला पोलिसांनी केलेल्या मारहाण प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष अरुण खरमाटे यांनी केली आहे. 

खरमाटे म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. संचारबंदी कालावधीत कामाच्या ठिकाणी येताना बरीच कसरत करावी लागते. तरीही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कर्मचारी सेवा बजावत आहेत. हिंगणगाव आरोग्य केंद्राचे आरोग्य सहायक संदीप खताळ यांना एका उपसरपंच यांनी फोनवरून धमकी दिली. हा प्रकार अतिशय चुकीचा आहे. दरम्यान बागणी आरोग्य केंद्राकडे एक आरोग्य सेविका पतीसमवेत जात होत्या. पोलिसांनी संचारबंदीचे कारण देत आरोग्य सेविकेच्या पतीला मारहाण केली. हे दोन्ही प्रकार चुकीचे आहेत. संबंधितांवर कारवाई करावी.