Wed, Jun 26, 2019 17:26होमपेज › Sangli › इस्लामपुरात पाककृती स्पर्धेला प्रतिसाद

इस्लामपुरात पाककृती स्पर्धेला प्रतिसाद

Published On: Jan 23 2018 1:14AM | Last Updated: Jan 22 2018 9:17PMइस्लामपूर : शहर वार्ताहर

मकर संक्रातीचे औचित्य साधून  दै. पुढारी कस्तुरी क्लब व वारणा बझारच्यावतीने महिलांसाठी रविवारी पाककृती, फनी गेम्स स्पर्धा व हळदी-कुंकू समारंभ घेण्यात आला. याला   महिलांचा  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

स्पर्धेचे उद्घाटन डॉ. जिज्ञा शहा, महिला बालकल्याण समितीच्या उपसभापती सीमा पवार यांच्याहस्ते झाले. तर नगरसेविका प्रतिभा शिंदे यांच्याहस्ते गहू, तांदूळ, गूळ, शाळू महोत्सवाचे उद्घाटन झाले.
पाककृती स्पर्धेत तांदळापासून गोड व तिखट पदार्थ बनविण्यात आले. 100 पेक्षा जादा महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. गोड पदार्थ - प्रथम  -निरा दीपक चव्हाण (शिरगाव), द्वितीय - हेमलता घोरपडे (इस्लामपूर), तृतीय -जयश्री मुरलीधर पाली (शिरगाव), सुनीता प्रमोद शहा (ताकारी) यांनी अनुक्रमे यश मिळविले. तिखट पदार्थ- प्रथम  - शाकीरा मकानदार, मनोरमा घोरपडे, सुनंदा फल्ले, अरुणा शहा (सर्व इस्लामपूर) यांना अनुक्रमे क्रमांक मिळाले. परीक्षक म्हणून अलका शहा, प्रमिला जोशी यांनी काम पाहिले.

विजेत्यांना वारणा बझारचे व्यवस्थापक शरद महाजन, उपाध्यक्ष सुभाष देसाई, सल्लागार विजय केसरकर, शिवाजी पाटील, मोहनराव आजमाने, दिलीप पाटील, शाखाधिकारी दिलीप काळेबेरे आदींच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. अनुजा होरे, संगीता वरेकर, शारदा शिंदे, अश्‍विनी कोळी, वैशाली घोरपडे, श्‍वेता माळी, सुवर्णा इंगवले यांनी यश पटकावले. 
हळदी-कुंकू समारंभाला सुमारे दीड हजार महिलांनी हजेरी लावली. वारणा बझारच्यावतीने महिलांना हळदी-कुंकूनिमित्त वाण भेट देण्यात आले. खाद्य पदार्थामध्ये भेसळ  कशी   केली जाते, याची माहिती देण्यात आली. संयोजन कस्तुरी क्लबच्या संयोजिका मंगल देसावळे यांनी केले. कमिटी मेंबर स्मिता पाटील, प्रियांका पाटील, राधिका चौगुले व आशा पवार, सरिता माने यांचे सहकार्य लाभले.