Thu, May 23, 2019 20:24
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › मनपा मुख्यालयालाच नाही कोणतीच अग्निशमन यंत्रणा

मनपा मुख्यालयालाच नाही कोणतीच अग्निशमन यंत्रणा

Published On: Mar 20 2018 1:50AM | Last Updated: Mar 19 2018 11:02PMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेच्या सांगली, मिरजेतील मुख्य इमारतीलाच आग प्रतिबंधक व जीव सरंक्षक उपाय योजना करण्यात आलेल्या नाहीत. याचा अवामी विकास पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशरफ वांकर यांनी सोमवारी पंचनामा केला.

महापालिकेत लटकविलेल्या अग्निशमनच्या सिलिंडरची मुदत  2013 मध्ये संपली आहे. याप्रकरणी त्यांनी पुराव्यांसह उपायुक्‍त सुनील पवार यांना निवेदन दिले. तातडीने उपाय योजना न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला .

ते म्हणाले, जी सिलिंडर बसविली आहेत. त्यांची वार्षिक तपासणी केलेली नाही. गेल्या 2013 पासून ती रिफील केलेले नाही. आगीची   अलार्म यंत्रणा बंद आहे. आग लागल्यानंतर महापालिकेच्या इमारतीतून बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्ग नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? 
 

tags : Sangli, Municipal Corporation, fire fighting, machinery, fire,safety, aquipment,