Tue, Jun 25, 2019 13:37होमपेज › Sangli › येवलेवाडी फाट्यावर अपघातात तांबेवेतील पती-पत्नी ठार

येवलेवाडी फाट्यावर अपघातात तांबेवेतील पती-पत्नी ठार

Published On: Jun 14 2018 1:35AM | Last Updated: Jun 13 2018 11:15PMनेर्ले : वार्ताहर

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर येवलेवाडी (ता. वाळवा) फाट्यावर मालट्रकने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत संभाजी ज्ञानदेव बल्‍लाळ (वय 60, रा. तांबवे, ता. वाळवा) व त्यांची पत्नी नंदाताई संभाजी बल्‍लाळ (वय 55) हे ठार झाले.  

नंतर त्या मालट्रकने  थांबलेल्या एस.टी. बसलाही धडक दिली. हा अपघात मंगळवारी रात्री झाला. कासेगाव पोलिस ठाण्यात  नोंद झाली आहे. पोलिसां कडून मिळालेली माहिती अशी ः तांबवे येथील संभाजी आणि नंदाताई बल्‍लाळ हे दाम्पत्य मंगळवारी रात्री कासेगावकडे मोटारसायकल (एम.एच.10 आर 4543) ने निघाले होते. 

येवलेवाडी फाट्यावर महामार्ग ओलांडताना कोल्हापूरकडून पुण्याकडे जाणार्‍या मालट्रक (एम .एच. 50एस 3396) ने मोटारसायकलला जोराची धडक दिली.  संभाजी बल्‍लाळ यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले.  नंदाताईही गंभीर जखमी झाल्या होत्या.

दरम्यान,  तिथे थांबलेल्या एस.टी. बस (एम. एच. 06 एस 8208) लाही मालट्रकने धडक दिली. या धडकेत एस.टी.चे सुमारे 20 हजारांचे नुकसान झाले. जखमी नंदाताई यांना उपचारासाठी कराड येथील रुग्णालयात दाखल केले.  त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. एस.टी. बस चालक शिवाजी काशीद यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिस कॉन्स्टेबल  महेश गायकवाड तपास करीत आहेत. संभाजी बल्‍लाळ हे कृष्णा साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी होते.