होमपेज › Sangli › मराठा विद्यार्थ्यांसाठी लवकरच वसतिगृह

मराठा विद्यार्थ्यांसाठी लवकरच वसतिगृह

Published On: Aug 09 2018 1:37AM | Last Updated: Aug 08 2018 10:51PMसांगली : प्रतिनिधी

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार  सांगली आणि मिरजेत येत्या 8 दिवसांत तात्पुरत्या स्वरूपाचे वसतिगृह सुरू करण्यात येईल. नंतर योग्य जागा निश्‍चित करून कायमस्वरुपी वसतिगृह बांधले जाईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

येथे वसतिगृहासाठी प्रस्तावित जागांची पाहणी ना. पाटील यांनी केली. मिरज येथील लोंढे कॉलनीतील महानगरपालिकेचा हॉल व सांगलीत महानगरपालिका शाळा क्रमांक 5 या ठिकाणांची त्यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील, आयुक्‍त रवींद्र खेबुडकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी, मिरज उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एस. जाधव, उपायुक्त सुनील पवार व स्मृती पाटील उपस्थित होते. 

ते म्हणाले, सांगली आणि मिरजेत आठ दिवसात सर्व सोयींनीयुक्त दोन वसतिगृहे लवकरच सुरू करण्यात येत आहेत. त्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात येईल. जिल्हाधिकारी  पाटील म्हणाले,  मराठा समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी येथील शंभर फुटी रस्त्यावरील साडेतीन एकर जागेत वसतिगृह उभारण्याचा प्रस्ताव दोन दिवसात शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.