कस्तुरीतर्फे दहावीतील गुणवंतांचा सत्कार

Published On: Jun 24 2019 1:22AM | Last Updated: Jun 24 2019 1:33AM
Responsive image


सांगली : प्रतिनिधी

दै. पुढारीच्या कस्तुरी क्लबतर्फे रविवार, दि. 30 रोजी दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रदीप पाटील हे ‘करिअर व व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सांगलीतील रिलायन्स मार्टजवळील राजपूत क्लासेसच्या व्हाईट हाऊसमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. 

कस्तुरी क्लब महिला व विद्यार्थ्यांसाठी सतत नाविण्यपूर्व उपक्रम राबवित आहे. नुकत्याच झालेल्या  क्लबच्या  सहलीत  महिलांनी मनमुराद आनंद लुटला.तसेच  सोमवार, दि. 24 ते बुधवार, दि. 26 या कालावधीत  महिलांसाठी  झुंबा वर्कशॉप आयोजित केले आहे. याबरोबरच नुकताच दहावी परीक्षेचा निकाल लागला आहे.  यात अनेक विद्यार्थ्यांनी   चांगले यश मिळविले आहे. या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकून त्यांना प्रेरणा देण्यासाठी कस्तुरी क्लबतर्फे त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच भेटवस्तू देण्यात येणार आहे

रविवार, दि. 30 रोजी दुपारी 12 वाजता सांगलीतील रिलायन्स मार्टजवळील रजपूत क्लासेसच्या व्हाईट हाऊसमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रदीप पाटील हे ‘करिअर व व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.या  कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांस 80 टक्केपेक्षा अधिक गुण असणे अपेक्षित आहे. यासाठी संबधित  पालक व विद्यार्थ्यांनी पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे.  विद्यार्थ्यांनी गुणपत्रकांची झेरॉक्स दै. पुढारीच्या जिल्हा परिषदेसमोरील पुढारी भवन या कार्यालयात सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या कालावधीत जमा करावी. त्यासाठी अंतिम मुदत शनिवार, दि. 29 आहे.   

अधिक माहितीसाठी संपर्क: तनईम - 9325477714, परितोष  - 976613003, पुढारी भवन, पहिला मजला, जिल्हा परिषदेसमोर, सांगली.