तासगावला मुसळधार पावसाने झोडपले (video)

Last Updated: Oct 20 2019 7:37PM
Responsive image

Responsive image

तासगाव : शहर प्रतिनिधी

शहरासह तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा धुवाँधार पाऊस सुरू झाल्याने कापूर ओढा ओसंडून वाहू लागला आहे. रविवारी दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या लोकांची या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली.

शहरासह तालुक्यात यंदा पावसाने तुफान हजेरी लावली आहे. मागील महिन्यात मोठा पाऊस झाल्याने कापुर ओढा, अग्रणी या लहान नद्यांना पुर आल्याने अनेक गावात पुराचे पाणी शिरले होते. यानंतर गेली चार दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र दोन दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने तुफान हजेरी लावली आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर शेतीचे नुकसान होवू लागले आहे.

तर या पडणाऱ्या पावसामुळे उद्या होणाऱ्या मतदानावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. बहुचर्चित आणि राज्याचे लक्ष लागून असलेली लढत तासगाव मतदारसंघात होत आहे. आर. आर पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर त्यांचा प्रचार रोहित पाटील यांनी केला आहे. 

मात्र, दोन दिवसांपासून हजेरी लावलेल्या पावसामुळे उद्या होणाऱ्या मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुमनताई यांच्यासह इतर सर्वच उमेदवारांना मतदार राजाला मतदान केंद्रावर नेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. तसेच या पावसामुळे दिवाळीनिमित्त लोकांना खरेदी करण्यासाठी बाहेर पडणेही मुश्किल झाले आहे.