Wed, Nov 21, 2018 17:26होमपेज › Sangli › तासगाव पूर्व भागात वादळी वाऱ्यासह पाऊस 

तासगाव पूर्व भागात वादळी वाऱ्यासह पाऊस 

Published On: May 31 2018 8:30PM | Last Updated: May 31 2018 8:30PMमांजर्डे(जि. सांगली): वार्ताहार

 तासगाव तालुक्यातील पूर्व भागातील हातनूर, मांजर्डे, मोराळे, पेड, गौरगाव, बलगवडे, बस्तवडे, वायफळे, सावळज या गावांत गुरुवारी सायंकाळच्या वेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. जोरदार वारा व विजांच्या कड़कडाटासह पाऊस पडल्‍यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. 

गुरुवारी सायंकाळी ७ व्या सुमारासल आलेल्‍या जोरदार पाऊसामुळे उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.  शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. याचा लाभ पेरणीपूर्व मशागतींना होणार आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. जोरदार वाऱ्यामुळे विजेचे खांब पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. तर, मांजर्डे येथील विठ्ठल मंदिराच्या शेडचे पत्रे जोरदार वाऱ्यामुळे उडून गेले आहेत