Wed, Sep 26, 2018 14:19होमपेज › Sangli › हृदयविकाराच्या धक्क्याने मुख्याध्यापकाचा मृत्यू 

हृदयविकाराच्या धक्क्याने मुख्याध्यापकाचा मृत्यू 

Published On: Jan 31 2018 2:06AM | Last Updated: Jan 30 2018 11:40PMसोनी : वार्ताहर

सोनी (ता. मिरज) येथील जिल्हा परिषद शाळे (क्रमांक 1) चे मुख्याध्यापक धनाजी शिवराम चव्हाण (वय  49, मूळ गाव वडगाव, सध्या रा.  सुभाषनगर,  मिरज )  यांचे शाळेतच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मंगळवारी  निधन झाले. 

सोनी येथील जिल्हा परिषद शाळेतील  विद्यार्थीप्रिय  शिक्षक अशी चव्हाण यांची ओळख होती. शाळेत मधल्या सुट्टीत जेवण करीत असताना ते अचानक चक्‍कर येऊन खाली कोसळले. त्यामुळे शाळेतील सहायक शिक्षकांनी त्यांना तातडीने मिरज येथील  मिशन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र,  उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.