Wed, Mar 20, 2019 22:57होमपेज › Sangli › मिरजेत आरोग्य विभागाचे ‘ऑनड्युटी’ कर्मचारी गायब

मिरजेत आरोग्य विभागाचे ‘ऑनड्युटी’ कर्मचारी गायब

Published On: Dec 21 2017 1:51AM | Last Updated: Dec 20 2017 11:25PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

मिरजेत आरोग्य विभागाचे स्थायी समिती सभापती बसवेश्‍वर सातपुते यांनी बुधवारी अचानक भेट देऊन झाडाझाडती घेतली. यावेळी सात कर्मचारी गायब असल्याचे आढळून आले. त्यांच्या हजेरीपत्रकावर सात दिवसांपासून सह्याही नव्हत्या. 

याबाबत उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. यामुळे  सातपुते यांनी त्यांचा पगार कपातीचे आदेश दिले.  स्वच्छता निरीक्षक भरत कोलप व अतुल आठवले यांना सफाई कर्मचारी या मूळपदावर आणण्याची शिफारसही त्यांनी आयुक्‍तांकडे केली. 

शहरात स्वच्छतेबद्दल नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे सभापती सातपुते, कामगार अधिकारी चंद्रकांत आडके, विशाल कुलगुटगी यांनी आरोग्य विभागाची झाडाझडती घेतली. 

मिरजेतील जवाहर चौक, आरफा हॉटेल, मिरज मार्केट परिसरातील आरोग्य विभागाच्या हजेरी शेडमध्ये जाऊन रजिस्ट्ररची तपासणी केली. त्यामध्ये सात कर्मचार्‍यांच्या अनेक दिवसांपासून सह्या नसल्याचे आढळून आले. या कर्मचार्‍यांचा पगार कपात करण्याच्या सूचना सभापती सातपुते यांनी कामगार अधिकारी  आडके यांना दिल्या.