Fri, Jul 19, 2019 22:04होमपेज › Sangli › सांगलीचे ७० एमएलडी केंद्र २५ फेब्रुवारीपर्यंत सुरू

सांगलीचे ७० एमएलडी केंद्र २५ फेब्रुवारीपर्यंत सुरू

Published On: Jan 09 2018 1:36AM | Last Updated: Jan 08 2018 11:46PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

माळबंगला येथील 70 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. त्याची चाचणी घेऊन येत्या दि. 25 फेबु्रवारीपर्यंत ही योजना कार्यान्वित होईल. सांगली, मिरजेचा भविष्यातील 20 वर्षांचा पाणीप्रश्‍न सुटेल, असे महापौर हारूण शिकलगार यांनी सांगितले. 

सोमवारी त्यांनी आयुक्‍त व गटनेते किशोर जामदार यांनी कामाची पाहणी करून प्रमुख अधिकारी व ठेकेदारांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. ठेकेदारांची थकित बिले लवकरात लवकर देऊ, पण काम रखडता कामा नये, असेही त्यांनी बजावले.
सांगली व कुपवाड शहराला मुबलक व शुध्द पाणीपुरवठा व्हावा म्हणून माळबंगला येथे 56 एमएलडी व 70 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरू आहे. याचा शिकलगार, आयुक्‍त रविंद्र खेबुडकर व गटनेते किशोर जामदार यांनी सोमवारी घेतला. पाणीपुरवठा अभियंता शीतल उपाध्ये यांनी या योजनेची सविस्तर माहिती पदाधिकार्‍यांना दिली. 

उपाध्ये म्हणाले, 56 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे काम अपूर्ण आहे. ठेकेदाराने काही कामे अपूर्ण ठेवली आहेत. त्याचे बिल अद्याप आदा केले नाही. त्या बिलातून काम न झालेली रक्‍कम वसूल केली जाणार आहे. अपूर्ण कामाचे नव्याने अंदाजपत्रक तयार करून मंजुरी घेत कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

ते म्हणाले, 70 एमएलडीबाबत बोलताना उपाध्ये म्हणाले, येथील जलशुद्धिकरण केंद्राचे सर्व काम पूर्ण झाले आहे. त्यानुसार तीनवेळा चाचण्या देखील घेण्यात आल्या आहेत. आठ ठिकाणच्या टाक्यांची चाचणी सुरू आहे. सांगलीवाडी, माळबंगला, संजयनगर, पोळमळा, आकाशवाणी जवळील पाण्याच्या टाकीची चाचणी यशस्वी झाली आहे. मात्र सध्या पूर्ण क्षमतेने पाणी भरण्यात आलेले नाही. सहा टाक्या पूर्ण क्षमतेने भरण्याचे काम उद्यापासून करण्यात येणार  आहे. 

या योजनेच्या ठेकेदारांनी थकित बिलाची मागणी खेबुडकर यांच्याकडे केली. थकित बिले देण्यासंदर्भात वित्त आयोगाचा निधी वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे ठेकेदारांनी कामे सुरू करावीत, पैसे दिले जातील असे खेबुडकर यांनी स्पष्ट केले.